Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदिंडोरी : बुधवारी कादवाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ

दिंडोरी : बुधवारी कादवाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ

ओझे | Oze

कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४४ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ बुधवार (दि.३०) होणार आहे.

- Advertisement -

कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता समारंभ होईल अशी माहिती कादवाचे उपाध्यक्ष उत्तमबाबा यांनी दिली.

कादवा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पुरेशी ऊस तोड मजूर भरती केली आहे. बॉयलर अग्नि पदीपन पूजन विठृल त्र्यंबक संधान, बाळासाहेब मुरलीधर आथरे व अशोक माधव भालेराव यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे.

सदर कार्यक्रमास सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांनी कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक मडळ व प्र.कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या