Tuesday, April 23, 2024
Homeजळगावजिल्ह्यात म्युकरमाईकोसीसचे आढळले 13 रुग्ण

जिल्ह्यात म्युकरमाईकोसीसचे आढळले 13 रुग्ण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनापाठापोठ आता कोरोनातून बरे झाल्यानंतर होणार्‍या म्युकरमाईकोसीस या आजाराने पाय रोवले आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमाईकोसीसचे 13 रुग्ण आढळले असून यापैकी 7 रुग्ण यशस्विरित्या बरे झाले आहेत. अशी माहिती आज गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

करोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमाईकोसीस हा आजार होतो. याला ब्लॅक फंगस असेही म्हणतात. जानेवारी महिन्यापासूनच जिल्हा प्रशासनाने याबाबतच्या कार्यपध्दतीचे नियोजन केले होते.

त्यानुसार टॉक्सफोेर्स नियुक्त करुन त्याच्याकडून माहिती घेवून संबंधित आजार, त्याची लक्षणे याबाबत माहिती जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांपर्यंत पोहोचवली होती. सध्यस्थितीत जिल्हा प्रशासनाने कक्ष नियुक्त केला असून त्या कक्षांकडून जिल्हयात करोनाबाधितांवर उपचार केले जाणार्‍या रुग्णालयांकडून माहिती घेतली जाते.

यात ज्या रुग्णांची प्रतिकार शक्ती कमी आहे, अशा रुग्णांना संबंधित कक्षाकडून विचारणा करुन म्युकरमाईकोसीसची लक्षणे आहेत का, याबाबत विचारणा केली जाते. वेळीच माहिती मिळाल्यावर संबंधित रुग्णावर उपचार केले जावून तो बरा होता.

उपचारासाठी जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता यांनी एक कक्ष उभारला आहे. तसचे काही खाजगी रुग्णालयांमध्येही उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. म्युकरमाईकोसीस आजाराची लक्षणे असली तर लवकरात लवकर कळवावे, जेणेकरुन वेळीच उपचार होवून तो रुग्ण बरा होतो, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या