Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या'पंचवटी एक्सप्रेस'चा बहुप्रतीक्षित 'एमएसटी' पास होणार सुरू

‘पंचवटी एक्सप्रेस’चा बहुप्रतीक्षित ‘एमएसटी’ पास होणार सुरू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मध्य रेल्वेने ट्रेन (Central Railway) क्रमांक १२१०९/१० (सीएसएमटी-एमएमआर, CSMT-MMR) पंचवटी एक्स्प्रेसचे (panchavati express)डी १२ ते डी १७ असे सहा २ एस डबे सामान्य डब्यांमध्ये (General quota) रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे…

- Advertisement -

हंगामी तिकीट (Season Ticket) आणि प्रवास तिकीट (travel ticket) धारकांना सुपरफास्ट ट्रेनमध्ये (Super fast train) लागू असलेल्या सुपरफास्ट शुल्कासह प्रवास करण्याची परवानगी येत्या 25 डिसेंबर 2021 पासून देण्यात आल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या प्रवासांसाठी गोड बातमी मिळाली आहे.

मध्य रेल्वेने या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या तत्वांचे पालन प्रवाशांना प्रवास करताना बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या ८ ऑक्टोबरच्या आदेशानुसार, केवळ विशिष्ट प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती.

यात युनिव्हर्सल ट्रॅव्हल (Universal Travel) पास असलेला पूर्ण लसीकरण (Vaccinated झालेला प्रवासी, व्यक्ती तंदुरुस्त असला पाहिजे. तसेच मान्यताप्राप्त डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणात असले पाहिजे. तसेच 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींना प्रवासाची मुभा देण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या