Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यापोलीस यंत्रणेचे खूप मोठं फेल्युअर; पवारांच्या घरावरील हल्ल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

पोलीस यंत्रणेचे खूप मोठं फेल्युअर; पवारांच्या घरावरील हल्ल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी कर्मचाऱ्यांकडून (Msrtc Employees Strike) सुरू असलेल्या आंदोलनाने काल आक्रमक वळण घेतल्याचं पाहायला मिळालं.

- Advertisement -

आंदोलक कर्मचारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि जोरदार निदर्शने केली. यावेळी काही लोकांकडून चप्पल आणि दगडफेकीचाही प्रयत्न झाला. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सवाल उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस बोलतांना म्हणाले, ‘एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर लोक प्लॅनिंग करून जातात, तेव्हा पोलीस काय करत होते. एवढ्या मोठ्या आंदोलनाची पोलिसांना कल्पना नसणे, हे पोलिसांचं अपयश आहे. पोलिसांच्या आणि गुप्तचर यंत्रणांच्या या अपयशाची चौकशी व्हायला हवी, माध्यमांचे कॅमेरामॅन त्याठिकाणी पोहोचले पण पोलीस उशीरा पोहोचले, याचं कारण काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या