Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारबससेवेला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद

बससेवेला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

कोरोना महामारीमुळे राज्यभर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात गेल्या साडेपाच महिन्यापासून सर्वसामान्यांची जीवन वाहिनी अर्थात राज्य परिवहन महामंडळाची लाल्परी एसटीची चाके थांबली होती.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर आंतर जिल्हा एसटी बस सेवा सुरू करण्याबाबत वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखविला. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी द्वारे प्रवास करण्यासाठी ई- पासची आवश्यकता राहणार नाही. चालक-वाहकासह प्रत्येक प्रवाशांच्या आरोग्य सुरक्षेसाठी काळजी घेण्यात येईल.

- Advertisement -

मनोज पवार – आगार प्रमुख ,नंदुरबार

अखेर विघ्नहर्ता गणरायाने हे विघ्न दूर करून गुरुवार दि. 20 ऑगस्ट पासून आंतरजिल्हा एसटी बसेस सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने नंदुरबार आगारातर्फे आजपासून धुळे आणि नाशिकसाठी एसटी सेवा सुरू करण्यात आली.मात्र पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद मिळाला.दरम्यान बस वाहतुकिसाठी 60 चालक व वाहक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.

कोरोना महामारीमुळे गेल्या दि.22 मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबारसह महाराष्ट्र राज्यातील सर्वच आगारातील एसटी बसेसची चाके थांबली होती. सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीय आणि किंबहुना श्रीमंतांसाठी देखील जीवन वाहिनी ठरलेल्या लाल्परी अर्थात एसटीची सेवा गेल्या 72 वर्षापासून महत्त्वपूर्ण ठरली आहे .

मात्र कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कोट्यावधी उत्पन्नावर परिणाम झाला. अखेर दिनांक 19 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी सायंकाळी उशिरा आदेश पारित केले. याबाबत दिनांक 20 ऑगस्टपासून राज्यातील सर्व आगारातून आंतरजिल्हा बस सेवा सुरू करण्याबाबत निर्देशित करण्यातआले आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबारसह नवापूर, शहादा, अक्कलकुवा, आगार सज्ज झाले आहेत.

मिशन बिगेन फेज चारनुसार प्रवाशांच्या सेवेसाठी आजपासून राज्यातील सर्व आगारातून आंतरजिल्हा एसटी सेवा सुरू झाल्याने लाखो प्रवाशांसह कर्मचांर्‍यामध्ये समाधान व्यक्त होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वरूपातील एसटी बस सेवा सुरू करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.

याबाबत पुरेशी खबरदारी घेऊन आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यासाठी धुळे विभागातील नंदुरबार अंतर्गत सर्व आगारातून पहिल्या टप्प्यात धुळे आणि नाशिक सेवा सुरू करण्यात येत आहे. प्रत्येक बस स्थानकावर आणि बसेस मध्ये वेळोवेळी जंतूनाशक फवारणी करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसमध्ये किमान 22 प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या