Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमहावितरण अधिकार्‍यांंना शेतकर्‍यांचा घेराव

महावितरण अधिकार्‍यांंना शेतकर्‍यांचा घेराव

वाडीवर्‍हे | वार्ताहर Vadivarhe

महावितरण वितरण (MSEDCL) कर्मचार्‍यांनी सूचना दिलेली नसताना शेतकर्‍यांची विज तोड़ली. परिसरातील दहा ते बारा गावातील संतप्त शेतकर्‍यांनी (farmers) महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून अधिकार्‍यांना घेरावा घातला.

- Advertisement -

मागण्याचे निवेदन (memorandam) दिले. पुरवठा सुरळीत केला नाही तर, आंदोलन (agitation) करण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी शिवसेनेचे (shiv sena) माजी तालुका प्रमुख राजू नाठे, शेकापचे संदीप पागेरे, वाडीव-हेचे सरपंच रोहिदास कातोरे,कु-हेगावचे सरपंच भाऊसाहेब धोंगड़े, मुरंबीचे सरपंच बापू मते, सांजेगावचे सरपंच नीता गोवर्धने, भाजपचे दशरथ दिवटे, यांच्याबरोबरच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरण कंपनीने परिसरातील वाडीव-हे,मुरंबी, सांजेगाव,गड़गड सांगवी, लहंगेवाड़ी, गोन्दे, पाडळी,कु-हेगाव, बेलगांव,अस्वलि स्टेशन, नांदगांव बु.. आदि परिसरातील विज कनेक्शन तोडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या