Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार येथील महावितरणचे कार्यालय गायब

नंदुरबार येथील महावितरणचे कार्यालय गायब

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

गेल्या 35 वर्षापासून बेकायदेशीररित्या ताबा (Illegal possession) करुन ठेवलेल्या महावितरणाचे कार्यालय (MSEDCL office) न्यायालयाच्या आदेशाने (court order) खाली (lower) करण्याची नामुष्की महावितरणवर आली. सदर जागेचा ताबा (Possession of the land) मुळ मालकाला (original owner) देण्यात आला आहे. दरम्यान, महावितरणच्या कार्यालयात सामान्य अस्ताव्यस्त पडला असून उर्वरित सामान शहरातील कार्यकारी अभियंता कार्यालयात हलविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यावर बसस्थानकासमोर (In front of the bus stand) व्यापारी मदनलाल जैन यांच्या मालकीची 40 हजार स्केअर फुट जागा 1937 साली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला (Maharashtra State Electricity Distribution Company) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Additional Executive Engineer)यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी (Office work) 50 वर्षाच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. 50 वर्षासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून जागेचे मालक मदनलाल जैन यांना वार्षिक 351 रुपये भाडे देण्याचा करार करण्यात आला होता.

1987 साली सदर करार संपुष्टात (Agreement terminated) आल्यानंतर जागेचे मालक मदनलाल जैन यांनी जागा खाली करून मिळावी अशी मागणी केली. मात्र, महावितरण कंपनीच्या ((MSEDCL) मुजोरपणा करुन सदर जागा मालक मदनलाल जैन यांना परत न करता कार्यालयीन कामकाजासाठी वापर सुरु होता.

दरम्यान 2000 साली मदनलाल जैन यांनी जागेचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयीन लढाई (Court battle) सुरू केली. 2006 साली दिवाणी न्यायालयाचा निकाल मदनलाल जैन यांच्या बाजूने लागला. तरीदेखील महावितरण कंपनीने जागेचा ताबा दिला नाही. त्यानंतर सदर केस जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असताना 2011 साली जिल्हा सत्र न्यायालयाने देखील मालक मदनलाल जैन यांना ताबा मिळावा असा निकाल दिला. त्यानंतरही महावितरण ((MSEDCL) विभागाकडून ताबा देण्यात आला नव्हता.

त्यानंतर मालक मदनलाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात धाव (Aurangabad bench) घेतल्यानंतर 15 नोव्हेंबर 2021 रोजी हायकोर्टाने मालक मदनलाल जैन यांना ताबा मिळावा असा निकाल दिला. त्यानंतर महावितरण कंपनीला गेले आठ महिने वारंवार खाली करण्याची विनंती करूनदेखील जागेचा ताबा दिला जात नसल्याने आज दि.14 जून रोजी अखेर मदनलाल जैन यांनी वकिलांचा व कोर्ट कर्मचार्‍यांचा फौजफाटा (army of lawyers and court staff) घेऊन महावितरण कार्यालय खाली करण्यास भाग (MSEDCL office forced down) पाडले आहे.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातून अखेर सामान काढून खाली करण्यास सुरुवात झाली आहे. महावितरण (MSEDCL) विभागाचा मुजोरीपणा आणि निष्काळजीपणाला अखेर खंडपीठाने दणका दिल्यानंतर कर्मचारी वठणीवर आले आहे. गेली 35 वर्ष महावितरण कंपनीने जागेचे मालक मदनलाल जैन यांना भाडे (Rent) दिलेले नाही. भारतीय संविधानावर आणि न्याय व्यवस्थेवर मला पूर्ण विश्वास असल्याने मी न्यायालयीन लढा लढून माझ्या मालकीच्या जागेचा हक्क मिळविला असल्याची प्रतिक्रिया व्यापारी मदनलाल जैन यांनी दिली.

सदर महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातून नंदुरबार शहर व परिसरात वीज वितरणाचे काम (power distribution work) चालत होते. त्यामुळे मोठ्या सामान अस्ताव्यस्त पडलेला आहे. ऐरवी सामान्य नागरिक व कार्यालयांच्या वीज कनेक्शन कट (Power connection cut) करण्यासाठी तत्पर राहणार्‍या महावितरण कार्यालयावर आज व्यापारी मदनलाल जैन यांनी न्यायालयीन लढा देत त्यांना मोठा झटका दिला आहे. दुपारपासून कार्यकारी अभियंता संजय पाटील, अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता मनीषा कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी खाजगी वाहनांसह शासकीय वाहनांमध्ये सामान भरून नंदुरबार शहरातील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात घेऊन गेलेत.

सदर महावितरण कार्यालयाच्या बदलामुळे शहरी भागातील 28 हजार व ग्रामीण भागातील 15 हजार असे जवळपास पन्नास हजार ग्राहक वीज बिल भरणा व नवीन वीज कनेक्शन व तक्रारी यांची तारांबळ होणार आहे. ग्राहकांसाठी काही सोय करण्यात येणार याबाबत विचारले असता वरिष्ठ नेत्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

दरम्यान, वीजवितरणच्या कार्यालयात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या अनेक पत्रकारांना (journalists)महावितरणच्या अधिकार्‍यांनी (MSEDCL officials) अरेरावी केली. पत्रकारांवर अरेरावीची भाषा करणारे अधिकारी सामान्य नागरीकांशी कसे वागत असेल असा प्रश्न निर्माण होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या