Saturday, April 27, 2024
Homeजळगावचाळीसगाव : महावितरणच्या अभियंत्याला मारहाण

चाळीसगाव : महावितरणच्या अभियंत्याला मारहाण

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

चाळीसगाव महावितरण कार्यालयात महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अखिलेश पुरूषोत्तम नंदनवार यांनी मोबाईल लावण्यास मनाई केल्याने याच राग येवून अभियंताला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील जुना पॉवर हॉऊस चौधरी वाडा येथील महावितरण कंपनीचे कार्यालय आहे. २३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास साहिल प्रेमराज गुजराथी ( रा. जुना पॉवर हाऊसरोड चौधरीवाडा चाळीसगाव ) हा महावितरण कार्यालयात मोबाइल चार्जिंगला लावला. दरम्यान महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अखिलेश पुरूषोत्तम नंदनवार यांनी मोबाईल लावण्यास मनाई केली.

याचा राग आल्याने साहिल गुजराथी, दिपक जगदीश गोयर व तुषार भुर्‍या खरटमल (सर्व रा. चाळीसगाव) यांना राग आल्याने नंदनवार यांना शिवीगाळ करून मारहाण केली. दरम्यान तू कार्यालयाच्या बाहेर तर निघ तुला दाखवतो असे सांगून धमकी दिली.

याप्रकरणी सहाय्यक अभियंता नंदनवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वरील तिघांविरुद्ध भादंवि ३५३,१८६,३३२,४५१,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पंकज पाटील करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या