वीज तोडण्यासाठी आलेल्या महावितरण कर्मचार्‍यांना मारहाण

jalgaon-digital
1 Min Read

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील कानिफनाथ चौकात असलेल्या लॉन्ड्रीच्या दुकानाचे विज बिल थकले असल्याकारणाने महावितरणच्या कर्मचार्‍यांनी वेळोवेळी तोंडी सूचना देऊन सुद्धा विज बिल न भरल्याने वीज कनेक्शन कट करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला राजेंद्र भाऊसाहेब देसाई व सिद्धार्थ भाऊसाहेब देसाई यांनी मारहाण करून स्वतःच्या अंगावर डिझेल ओतण्याचा प्रकार घडला असून या संदर्भात एक आरोपी अटक करण्यात आला असून एक फरार झाला आहे.

दरम्यान राहुरी शहरातील कानिफनाथ चौकात देसाई यांचे लाँड्रीचा व्यवसाय आहे परंतु त्या दुकानाचे विज बिल थकल्यामुळे महावितरणचे अधिकारी कर्मचारी त्यांना वीज बिल भरण्यास सांगण्यासाठी आले असता दुकानचे मालक राजेंद्र भाऊसाहेब देसाई व सिद्धार्थ देसाई या दोघांनी आलेल्या पथकातील अभियंत्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून घरातून डिझेलचा ड्रम आणून स्वतःच्या अंगावर ओतून घेतले परंतु आजूबाजूच्या नागरिकांनी मध्यस्थी करून सोडवा-सोडव केली.

त्यानंतर महावितरणचे सहाय्यक अभियंता योगेश तानाजी गावले, किरण पाचरणे व वायरमन प्रदीप अडसुरे यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन राजेंद्र भाऊसाहेब देसाई व सिद्धार्थ देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असूनआरोपी विरोधात भादवि कलम 353, 323, 324, 504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *