Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशएमपीएससी पुर्व परीक्षेचा निकाल जाहीर, नाशिकमधून 220 जणांची निवड

एमपीएससी पुर्व परीक्षेचा निकाल जाहीर, नाशिकमधून 220 जणांची निवड

मुंबई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (mpsc)राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आयोगाने मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली आहे. नाशिकमधून (nashik)220, नगरमधून 177(nagar), जळगाव 47(jalgaon), धुळे (dhule), 35 तर नंदुरबारमधून (nandurbar)10 जणांची निवड झाली आहे.

- Advertisement -

आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 लांबणीवर पडली होती. परीक्षेची तारीख लांबत असल्याने उमेदवारांकडून विविध मार्गांनी सरकारचं याकडे लक्ष वेधण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी निकाल https://mpsc.gov.in/downloadFile/english/3964 येथे पाहता येईल.

पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी आयोगाने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यात पुणे विभागातून सर्वाधिक 1 हजार 72 उमेदवारांची निवड झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या