Friday, April 26, 2024
Homeनाशिकएमपीएससी पूर्व परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये

एमपीएससी पूर्व परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध पूर्व परीक्षांच्या तारखा आयोगाने जाहीर केल्या आहेत. या परीक्षा ऑक्टोबर 2020 मध्ये होणार होत्या. पण विविध कारणांमुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या.

- Advertisement -

या परीक्षांमध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या परीक्षांचा समावेश आहे. या सर्व प्रलंबित परीक्षा आता मार्च आणि एप्रिल 2021 मध्ये होणार आहेत.

कोविड-19 संदर्भात शासनाकडून वेळोवेळी आलेल्या सूचनांच्या अनुषंगाने उपाययोजना करून या परीक्षांचे आयोजन करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा सह सचिवांनी म्हटले आहे.

परीक्षांच्या तारखा पुढीलप्रमाणे – राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 – 14 मार्च 2021, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा – 11 एप्रिल 2021, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 – 27 मार्च 2021

- Advertisment -

ताज्या बातम्या