Saturday, April 27, 2024
Homeजळगावचाळीसगावच्या कुख्यात गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

चाळीसगावच्या कुख्यात गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

जळगाव Jalgaon

चाळीसगाव शहरातील कुख्यात गुन्हेगार हैदरअली आसिफअली सैय्यद The culprit is Haider Ali Asif Ali Syed वय ३० रा. पिरसालेम नगर, नागदरोड, चाळीसगाव यांच्यावर जिल्हाधिकार्‍यांनीBy the Collector एमपीडीएची MPDA केली असून आदेशानुसार काल शुक्रवारी रात्रीच स्थानिक गुन्हे शाखेच्या local crime branch पथकाने हैदरअली यास नाशिक येथील कारागृहात स्थानबद्द केले आहे.

- Advertisement -

गुन्हेगार हैदरअली याच्याविरोधात चाळीगाव शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये मारहाण, विनयभंग, आर्म ऍक्ट तसेच दंगलीचे असे एकूण शरीराविरुध्दचे सार्वजनिक व लोकांच्या मालमत्ता विरोधातील असे एकूण १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

जामीनावर सुटल्यानंतर तो गुन्हे करत असल्याने त्याला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर हैदरअली याच्याविरोधात मालेगाव येथील पवारवाडी पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता.

हैदर अली यांच्यावर एमपीडीएची कारवाई करण्यात यावी याबाबत प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १३ ऑगस्ट रोजी हैदर अली यांच्यावर एमपीडीए कारवाईचे आदेश पारीत केले.

आदेशानंतर पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील, सुधाकर अंभोरे, राहूल पाटील, रावसाहेब पाटील तसेच चाळीसगाव पोलीस शहर पोली ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय ठाकूर, पोलीस नाईक विनोद भोई, सतिष राजपूत, विजय पाटील, विनोद खैरनार, भुषण पाटील यांच्या पथकाने गुन्हेगार हैदरअली यास चाळीसगावातून अटक केली. आदेशानुासर पथकाने त्यास नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल करुन स्थानबध्दतेची कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या