Thursday, April 25, 2024
Homeनगरखा. डॉ. विखेंकडून मनपाच्या अधिकार्‍यांची झाडाझडती

खा. डॉ. विखेंकडून मनपाच्या अधिकार्‍यांची झाडाझडती

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

केंद्र व राज्य शासनाच्या योजना पूर्णत्वाला जात नसतील व अधिकार्यांच्या लाल फितीच्या कारभारामध्ये त्याच त्याच प्रकारच्या अडचणी समोर येत आहे.

- Advertisement -

याचा फटका नगरकरांना बसत असेल तर त्याचा काय उपयोग, असा सवाल खासदार डॉ. सुजय विखे यांनी उपस्थित करून शहरातील अमृत योजनेचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले.

महानगरपालिकेमध्ये शनिवारी अमृत योजनेसह विविध योजना संदर्भात आढावा खासदार डॉ. सुजय विखे यांनी घेतला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, सभापती मनोज कोतकर, उपायुक्त प्रदीप पठारे, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

अमृत योजना साठी कोट्यावधी रुपयांचा निधी आला खरा मात्र एकही योजना पूर्णत्वालाला जायला तयार नाही. अधिकारी तेच तेच कारण सांगतात. मात्र काम व्हायला तयार नाही. 2010 साली फेस 2 ची योजना सुरू झाली आज दहा वर्ष होऊन देखील सुधार योजना पूर्णत्वाला जात नाही यासारखे दुर्दैव नाही. गटार योजनेमध्ये सर्व पाहणी केली पाहिजे सोमवारी या संदर्भात आढावा घेतला पाहिजे.

सारसनगरची मोजणी सुद्धा तात्काळ करून घ्या, सोलर सारखी महत्त्वाची योजना कशी चालू आहे, याची साधी माहिती सुद्धा येथील अधिकार्यांनाही दिली नाही. मग प्रत्यक्षात प्रोजेक्ट कसा होणार असे ते म्हणाले. महानगरपालिकेला तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी आणावे लागेल.

तरच महानगरपालिका सुधारेल नाहीतर काही खरं राहिलं नाही, अशा शब्दात खासदार डॉ. विखे यांनी अधिकार्यांचे चांगलेच वाभाडे काढले. महानगरपालिकेमध्ये अधिकारी चांगले नाही. त्यांना काही देणेघेणे राहिलेले नाही, असा आरोप महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बैठकीमध्ये करून त्यांनी अधिकार्यांचे वाभाडे काढले.

- Advertisment -

ताज्या बातम्या