Thursday, April 25, 2024
Homeजळगावखा.उन्मेष पाटील यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

खा.उन्मेष पाटील यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेच्या (National Security Advisory Council) अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Prime Minister Narendra Modi) अभिनंदन करीत देशातील पशुसंवर्धन पायाभूत सुविधा निधीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करुन डेअरी फार्मींगचा समावेश करावा तसेच जैव इंधनावर राष्ट्रीय मंडळ स्थापन करा, यासह मतदारसंघातील सात बलून बंधारे, टेक्सटाईल पार्क, विमानतळ, गणित नगरी, जळगाव शहराच्या दळणवळणासह औद्योगिक विकासासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. (Prime Minister Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भेटीदरम्यान खासदार उन्मेश पाटील यांचेकडून मतदारसंघाच्या विविध विकासाच्या प्रस्तावावर माहिती जाणून घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट मतदारसंघासाठी ग्रेट भेट ठरली असल्याची भावना (MP Unmesh Patil) खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

नवी दिल्ली येथे सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून आपल्या व्यस्त कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे सोबत खासदार उन्मेश पाटील यांची ग्रेट भेट झाली. पंतप्रधान यांच्याशी चर्चेदरम्यान (MP Unmesh Patil) खासदार उन्मेश पाटील यांनी देशाचे सलग सात वर्ष यशस्वी पंतप्रधान म्हणून आपल्या सक्षम नेतृत्वाखाली देशाचा सर्वच क्षेत्राचा सर्वांगीण विकास होत असल्याबद्दल नतमस्तक होत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन केले. देशातील महत्वाकांशी पशुसंवर्धन व पायाभूत सुविधा निधीच्या विद्यमान मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करावी.

यामध्ये डेअरी फार्मिंगचा उल्लेख नसल्याने दुग्ध व्यवसाय हा कृषी क्षेत्राच्या पूरक व्यवसाय भरभराटीस बाधा येणार असून यासाठी विद्यमान मार्गदर्शक तत्वांच्या कलम ६ अंतर्गत यादीत समावेश करावा. यामुळे कृषिप्रधान अर्थव्यवस्थेस अधिक बळकटी मिळणारं आहे. याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खासदार उन्मेश पाटील यांनी लक्ष वेधले. त्याचप्रमाणे जैवइंधनावरील राष्ट्रीय धोरणांच्या वर्तमान स्थिती बाबत अवगत करीत जैवइंधनावर राष्ट्रीय मंडळ स्थापन करा अशा मंडळाच्या समग्र निर्णय प्रक्रियेतून जैवइंधनाच्या विकासासाठी विशेष संशोधन व विकासावर लक्ष केंद्रित करता येईल. बायो सीएनजी आणि इथेनॉलच्या विकासास प्रोत्साहन मिळेल. राष्ट्रीय मंडळाच्या निरीक्षणातून समन्वयातून दिशादर्शक कार्यक्रम देत अपेक्षीत प्रगती देशाला साधता येईल. अशी भुमिका खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे कडे मांडली.

मतदारसंघातील विकासासाठी घातले साकडे

याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदासंघांविषयी माहिती घेतली. खासदार उन्मेश पाटील यांनी मतदार संघातील बळीराजाच्या जीवनात सिंचनक्रांती करणारा सात बलून बंधारे प्रकल्पाचा डिमांड क्रमांक ४० अंतर्गत नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा समावेश करण्याबाबत आपण व्यक्तिशः लक्ष द्यावे. तरच हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल. आपल्या उपस्थितीत याचे लोकार्पण व्हावे.हा अभिमानाचा क्षण खान्देश वासियांना अनुभवता यावा अशी विनंती केली. यावेळी टेक्सटाईल पार्क, जळगाव विमानतळ, गणित नगरी, जळगाव शहराच्या दळणवळणासह औद्योगिक विकासासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना (MP Unmesh Patil) खासदार उन्मेश पाटील यांनी साकडे घातले.

- Advertisment -

ताज्या बातम्या