विश्वासात न घेतल्यास के.के.रेंज जमीन अधिग्रहणाला विरोध – खा. डॉ. विखे

jalgaon-digital
1 Min Read

राहुरी |प्रतिनिधी Rahuri

संरक्षण खात्याने विश्वासात न घेता निर्णय घेतल्यास के.के. रेंज जमीन अधिग्रहणास आम्ही विरोध करणार आहोत. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी

याबाबत आम्ही समक्ष भेट घेऊन चर्चा केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊन शेतकर्‍यांची व्यथा मांडणार असल्याचे प्रतिपादन खा.डॉ.सुजय विखे यांनी केले.

राहुरी तालुक्यातील मुळा जलाशयाच्या पलिकडील वावरथ येथे खा.डॉ. सुजय विखे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत के.के.रेंजबाबत शेतकरी व ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी खा. डॉ. विखे बोलत होते.

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले, के.के. रेंजचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला गेला पाहिजे. यासाठी राजकारण विरहित सामूहिक प्रयत्न केला जाईल. खा.विखे व आपण यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतलेली आहे.

यावेळी पंचायत समिती व बाजार समितीचे संचालक सुरेश बानकर, सरपंच रामदास बाचकर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बाचकर, अविनाश बाचकर, वर्षा बाचकर आदींची भाषणे झाली.

यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, युवराज गाडे, वैशाली नान्नोर, बाळासाहेब जाधव, योगेश बानकर, अण्णासाहेब सोडनर, कारभारी बाचकर, सबाजी बाचकर, मिनीनाथ जाधव, दादासाहेब बाचकर, नायब तहसीलदार डमाळे, तलाठी कविता गडधे, हरिभाऊ आघाव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *