Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याखासदार श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, एकदा त्यांची...

खासदार श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, एकदा त्यांची…

नाशिक | Nashik

शिवसैनिकांची शिवसेना, राज्यातील प्रत्येक कुटुंब हे माझे कुटुंब ही भावना व विश्वास लोकांमध्ये दृढ करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी मागील सहा महिन्यात केले आहे. शेतकर्‍यांच्या संकटात पंचनाम्याचे निकष बाजूला ठेवत मदत दिली. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढत असून वर्षावर गर्दी वाढत आहे. तसेच ठाणे व मुंबई सोबतच नाशिकला जे लागेल ते देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांची असल्याचे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी केले…

- Advertisement -

Nashik : ऑनलाईन गेमच्या माध्यमातून २७ लाखांची फसवणूक; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक (Nashik) येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात खा. शिंदे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, या शिवसेना कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटणार असून त्यासाठी कार्यालयात वेगवेगळे कक्ष बनविण्यात आले आहेत. त्यामुळे एक भव्य दिव्य असे शिवसेना कार्यालय नाशिकमध्ये तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ ठार

पुढे बोलतांना खा. शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वसामान्य जनतेला डोळ्यापुढे ठेवले असून त्यांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. तसेच शिवसेना शिवसैनिकांमुळे मोठी होते, त्यामुळे गाव तेथे शाखा उभारण्याचे काम हाती घेण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन डॉक्टरांसह एकाचा मृत्यू

ते पुढे म्हणाले की, शिंदे सरकारची (Shinde Government) घोडदौड सूरु असल्याने विरोधक घाबरले असून त्यांच्याकडे खोक्याचे मुद्दे सोडून दुसरे मुद्दे नाही. त्यामुळे एकदा त्यांची नार्को टेस्ट कराच, कोणाकडे किती खोके आहेत हे समजेल असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. तसेच उद्धव ठाकरेंच्या भाषणात खोके, गद्दार, खंजीर याव्यतिरिक्त दुसरे शब्द राहत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे लक्ष देणे बंद करा असे, आवाहनही शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या दोघा भामट्यांना ५ महिन्यांनंतर पोलीसांनी केले जेरबंद

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. सुहास कांदे, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते प्रवक्ते नरेश म्हस्के, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा सेवक थापा यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या