Friday, April 26, 2024
Homeराजकीयगुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; खासदारांनं दिली पक्षाला सोडचिठ्ठी

गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; खासदारांनं दिली पक्षाला सोडचिठ्ठी

दिल्ली l Delhi

गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या मनमानीला कंटाळून गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघाचे खासदार मनसुखभाई वासवा (BJP MP Mansukhbhai Vasava Resigned) यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. खासदार मनसुख वसावा अनेक दिवसांपासून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी नाराज आहेत.

- Advertisement -

भाजपच्या अनेक बड्या नेत्यांपैंकी एक म्हणून मनसुखभाई वासवा ओळखले जातात. त्यांनी तब्बल सहा वेळा लोकसभा निवडणूक जिंकून खासदार म्हणून जबाबदारी हाताळलीय. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाच्या मनमानी कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं समजतंय. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

नेतृत्वाकडून आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्यानं मनसुखभाई वासवा नाराज होते. वासवा यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना एक पत्र लिहून आपली नाराजीही कळवली होती. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण लोकसभेचाही राजीनामा देणार असल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलंय. भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे मनसुखभाई वासवा चर्चेत आले होते. राज्यात आदिवासी महिलांच्या तस्करीचा मुद्दा त्यांनी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासमोर मांडला होता. तसंच स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या मुद्यावरही वासवा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’च्या जवळपासचा इको-सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्याची मागणी केली होती. ही मागणी या भागात राहणाऱ्या आदिवासींकडून केली जात होती. वासवादेखील याच वर्गाशी संबंधित आहेत. परंतु, पक्षानं मात्र वासवा यांच्या म्हणण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळे कंटाळून शेवटी वासवा यांनी राजीनामा सोपवण्याचा निर्णय घेतलाय.

- Advertisment -

ताज्या बातम्या