Thursday, April 25, 2024
Homeनगर21ला गौप्यस्फोट करतो: जिल्हा बँकेवर खा. डॉ विखे म्हणाले..

21ला गौप्यस्फोट करतो: जिल्हा बँकेवर खा. डॉ विखे म्हणाले..

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा बँकेच्या राजकारणात एकाकी पडलेले खा. डॉ. सुजय विखे हे रविवारी मतदानानंतर गौप्यस्फोट करणार आहेत

आपली सविस्तर भूमिका त्यादिवशी पत्रकारांसमोर मांडू असे स्पष्ट करत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे भाजप समन्वय समितीचे प्रतिनिधी म्हणून मंत्री थोरातांना भेटायला गेले असतील असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

नगर येथे पत्रकारांशी बोलताना खा. विखे यांनी ही माहिती दिली. महापौर बाबासाहेब वाकळे, शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यावेळी उपस्थित होते. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे आणि शिवाजीराव कर्डिले यांची समन्वय समिती स्थापन केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीत पक्षविरहित निवडणुकीसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. कर्डिले हे समन्वय समितीचे प्रतिनिधी म्हणून मंत्री थोरातांकडे गेले असतील असे सांगत त्यासंदर्भात 21 तारखेला बोलेल असे त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या 21 पैंकी 17 जागा बिनविरोध झाल्या असून चार जागांसाठी शनिवारी (दि.20) मतदान होत आहे. रविवारी 21 तारखेला मतमोजणी होऊन निकाल लागेल. निकालानंतर खा. विखे हे काय गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता आता नगरकरांना लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या