Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारखा.डॉ.हीना गावित यांना सहाव्यांदा मिळाला संसदरत्न पुरस्कार

खा.डॉ.हीना गावित यांना सहाव्यांदा मिळाला संसदरत्न पुरस्कार

नंदुरबार | प्रतिनिधी nandurbar

नंदुरबार लोकसभा (Lok Sabha) मतदार संघाच्या खा.डॉ.हीना गावित (mp Dr. Heena Gavit) यांना संसदेतील विशेष कामगिरीसाठी प्राईम पॉईन्ट फाऊंडेशनतर्फे (Prime Point Foundation) सन २०२२ चे संसदरत्न पुरस्कार नवीन (Maharashtra Sadan New Delhi) महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तब्बल सहाव्यांदा सदर संस्थेच्यावतीने संसदरत्न पुरस्कार (Sansadratna Award) प्रदान करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्राईम पॉईन्ट फाऊंडेशनतर्फे देशातील ११ खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हीना गावित यांचा समावेश आहे.

खा.डॉ.हीना गावित यांना सदर संस्थेच्यावतीने सहाव्यांदा सदरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. संसद भवनात लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्न, समस्या प्रभावीपणे मांडून त्याचे अभ्यासपूर्ण विवेचन करणार्‍या खा.डॉ.हीना गावित यांना सदरचा पुरस्कार आज दि.२६ मार्च २०२२ रोजी नवीन महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार सुशील चंद्राजी,

संसदीय कामकाज व संस्कृतीक मंत्री अर्जून राम मेघवाल यांच्या हस्ते नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खा. डॉ.हीना विजयकुमार गावित यांना सहाव्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या