Saturday, April 27, 2024
Homeनाशिकडॉ. भारती पवारांच्या कार्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली दखल

डॉ. भारती पवारांच्या कार्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली दखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नवनियुक्त केंद्रीय स्वास्थ्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) या केंद्रीय स्वास्थ्य राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून करोनामुक्तीसाठी करत असलेल्या कार्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनने (World Book of Records, London) दखल घेतली आहे…

- Advertisement -

सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वित्झर्लंड) (Certificate of Commitment) देऊन डॉ. पवार यांचा गौरव करण्यात आला. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यूरोपचे अध्यक्ष विल्यम जेजलर (William Jezler) यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये करोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे.

तसेच करोना मुक्तीसाठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वित्झर्लंड) ने व्यक्ती व संस्थांना सम्मानित करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांनी नवनियुक्त केंद्रीय स्वास्थ्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना नाशिक मर्चेंट इंडस्ट्रीयल बँकेच्या सभागृहात सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वित्झर्लंड) ने सम्मानित केले.

यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविदयालय नाशिकच्या उपक्षेत्रीय प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी, वासंती दीदी, ब्रह्माकुमारी पूनम दीदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या