Thursday, April 25, 2024
Homeनाशिकरोहिले येथील डोंगर पुन्हा आगीच्या भक्ष्यस्थानी

रोहिले येथील डोंगर पुन्हा आगीच्या भक्ष्यस्थानी

नाशिक । Nashik

त्र्यंबक तालुक्यातील गिरणारे जवळील रोहिला डोंगर पुन्हा एकदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे.

- Advertisement -

दरम्यान दरवर्षी या डोंगराला व परिसरात आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अनेक वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी वनविभाग तसेच विविध संस्था या डोंगरावर हजारो वृक्षांचे रोपण करीत असतात.

परंतु झाडांची योग्य वाढ झाली कि येथे आग लावली जाते. त्यामुळे येथे वन्यप्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहेत. अशावेळी दरवर्षी आग कशी काय लागते, याचे कोडे स्थानिकांना आहे. त्यामुळे वनविभागाने याकडे लक्ष देऊन हे कोडे सोडवणे गरजेचे आहे.

या डोंगराला लागून रोहिले, वड पाडा, साप्ते आदी गावे वसली आहेत. त्याचप्रमाणे काही लोकांची घरेही या परिसरात आहेत. त्यामुळे येथील जनावरे, नागरिक या ठिकाणी येत असतात. परंतु आगीचा हा प्रकार दरवर्षी होत असल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वनविभागाने वेळीच याबाबत पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या