दुभाजकावर आदळून मोटारसायकलस्वार ठार

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव । Jalgaon

महानगरपालिकेसमोर असलेल्या दुभाजकावर मोटारसायकल आदळून एक जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शाहू नगर परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मिलिंद सोमनाथ पवार (वय 46, रा.शाहू नगर) हे घराकडे जात असतांना मोटारसायकलने कट मारल्याने त्यांची मोटारसायकल दुभाजकावर आदळली. याचवेळी दुभाजकावर असलेल्या इलेक्ट्रीक डीपीवर असलेल्या लोखंडी खांबावर कोसळल्याने त्यांना जबरदस्त मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात होताच आजुबाजूच्या नागरिकांनी पोलीस स्टेशनला संपर्क करत सदर व्यक्तीस शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *