Friday, April 26, 2024
Homeनगरसाईबाबा संस्थानच्या हॉस्पिटल परिसरातून मोटारसायकल चोरीच्या टोळ्या सक्रिय

साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटल परिसरातून मोटारसायकल चोरीच्या टोळ्या सक्रिय

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरातील साईबाबा संस्थानच्या दोन्ही हॉस्पिटल परिसरातून दुचाकी चोरी करणारी टोळी

- Advertisement -

कार्यरत असून या टोळीला गजाआड करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या परिसरातून दुचाकी चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

शिर्डी शहरात साईबाबा संस्थानच्या साईनाथ हॉस्पिटल व साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण व नातेवाईकांची ये जा असते. या संधीचा फायदा घेऊन दुचाकी चोरणार्‍या टोळीने येथून 150 च्या आसपास मोटारसायकली चोरी केल्या आहेत. परंतु अद्यापही या टोळीला पकडण्यात शिर्डी पोलिसांना यश आले नसून त्याची खंत उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी देखील व्यक्त केली होती.

त्यानंतर उपविभागीय अधिकारी म्हणून संजय सातव यांनी पदभार घेतला. पण त्यांनाही या टोळीला गजाआड करण्यात यश मिळाले नसून रुग्णांच्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरणार्‍यांनी शिर्डी पोलिसांना आव्हान दिले आहे. एका महिन्यात किमान पाच ते सहा मोटारसायकली या परिसरातून चोरी जातात.

या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. साईबाबा संस्थान साई एम्प्लॉईज सोसायटीच्या माध्यमातून साई भक्तांना विविध सेवा देत असताना रुग्णालयात पार्कीगची जबाबदारी या सोसायटीकडे दिल्यास सोसायटीला दोन पैसे उत्पन्नही मिळेल व चोरी जाणार्‍या दुचाकी चोरीचे प्रमाण थांबेल. मात्र पोलीस प्रशासन व साईबाबा संस्थानच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

दि. 26 मार्च रोजी राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील विजय भास्कर भुसाळ, वय 52 हे येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. त्यांची दुचाकी बाहेर लावली असता चोरीला गेल्याची फिर्याद शिर्डी पोलिसांत दिल्याने शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तीन वर्षात अनेकवेळा दुचाकी चोरून शिर्डी पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिले असून शहरातील वाढत्या दुचाकी चोरांचा छड़ा पोलिसांनी लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या