Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक शहरात मातृदुग्ध पेढी प्रकल्प

नाशिक शहरात मातृदुग्ध पेढी प्रकल्प

नाशिक । प्रतिनिधी

शहरात कमी वजनाच्या मुलांचे चांगले पोषण व्हावेत आणि आईच्या दुधाअभावी नवजात बालकांचा मृत्यु दर कमी करण्याच्या दृष्टीने आता नाशिक महानगरपालिका महिला बाल कल्याण समितीच्यावतीने मनपाच्या तीन रुग्णालयात पाश्चराईज डोनर ह्युमन मिल्क या माद्यमातून माृतदुग्ध पेढी सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मनपा महिला बाल कल्याण समिती सभापती स्वाती भामरे यांनी दिली…

- Advertisement -

नाशिक शहर व परिसरातून प्रसुतीसाठी नाशिक शहरातील मनपातील रुग्णालयात अनेक महिला येत असतात. यातील कुपोषीत माता व बालकांना वाचविण्याचे प्रयत्न शासनाच्या विविध योजनाद्वारे केला जाऊन माता व नवजात बालक मृत्यु दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यात प्रसुती झाल्यानंतर काही मातांना नवजात बालकांना स्तनपान देणे शक्य होत नाही. तसेच बर्‍याच वेळा काही माता प्रसुतीचे वेळी कुपोषीत असतात किंवा काहींना अन्य कारणाने नवजांत बालकांना स्तनपान करता येत नाही. बालक आजारी किंवा कुपोषीत असल्यामुळे आई सायकोसिस मध्ये जाते, तेव्हा आईचे दुध कमी होते. प्रसुतीच्या दरम्यान आईचा मृत्यु झाल्यास बाळाला आईच्या दुधाला मुकावे लागते. तसेच अशा बालकांचे वजन कमी असते.

अशाप्रकारे नवजात बालकांची प्रतिकार शक्ती वाढवून त्यांना वाचविण्यासाठी पाश्चराईज्ड डोनर ह्युमन मिल्कची गरज असते. याकरिता रुग्णालयातील स्तनदा मातांचे अतिरीक्त दुध संकलीत करुन राज्यातील काही शहरात मातृदुग्ध पेढी सुरू करण्यात आल्या आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिक शहरात पाश्चराईज्ड डोनर ह्युमन मिल्क घेऊन ते गरजु नवजात बालकांना पुरविण्यासाठी मनपा महिला बाल कल्याण समितीने पुढाकार घेतला आहे.

याकरिता आता समितीकडुन यासदर्भातील प्रस्ताव आयुक्तांना दिला जाणार असुन यावर निर्णय झाल्यानंतर शहरात मातृदुग्ध पेढी सुरु केली जाणार असल्याची माहिती महिला बाल कल्याण समिती सभापती स्वाती भामरे यांनी दिली.

महिला बचत गटासाठी मार्गदर्शन

मनपा महिला बाल कल्याण समितीची सभा सभापती स्वाती भामरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. यात शहरातील सहा विभागातील विभागीय कार्यालयात महिला बचत गट स्थापन करण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांसह इतर मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक दोन महिलांकडुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे, यासंदर्भातील निर्णय झाला. तसेच घटस्फोटीत महिलाच्या मुलांच्या शिष्यवृत्तीची माहितीबाबत जनजागृती करण्याची मागणी प्रतिभा पवार यांनी केली. तसेच इतर विषयावर चर्चा झाली. याबैठकीत उपसभापती मिरा हांडगे, उपायुक्त अर्चना तांबे, सदस्य पुनम मोगरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या