Monday, April 29, 2024
Homeनगरआई-वडिलांनीच केली दारूड्या मुलाची हत्या

आई-वडिलांनीच केली दारूड्या मुलाची हत्या

राहाता |प्रतिनिधी| Rahata

दारू पिऊन घरातील लोकांना त्रास देत असल्याच्या कारणावरून राहाता तालुक्यातील न. पा. वाडी येथील एकास आई वडिलांंसह चौघांनी लाकडी दांड्याने जबर मारहाण करीत ठार केले.

- Advertisement -

अशोक गोपीनाथ धनवटे (वय 28), रा. न. पा. वाडी असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी न. पा. वाडीच्या पोलीस पाटील योगीता प्रताप धनवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी मयताचे वडिल गोपीनाथ बाबुराव धनवटे, आई कमल गोपीनाथ धनवटे (रा. न. पा. वाडी) चुलत भाऊ धनंजय बाबासाहेब धनवटे (रा. पिंप्रीनिर्मळ) व आत्याचा मुलगा सागर साहेबराव खरात (रा. निमगाव, राहाता) यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी रात्री 11 वाजता मयत अशोक गोपीनाथ धनवटे हा घरातील लोकांना दारू पिऊन त्रास देतो या कारणावरून वरील आरोपींनी संगनमत करून मयतास लाकडी दांड्याने जबर मारहाण करुन त्यास जीवे ठार केले. या स्वरुपाच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींच्या विरुध्द भादवि कलम 302, 34 नुसार राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. काल सोमवारी घटनास्थळाला श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलिस अधिक्षक दीपाली काळे, शिर्डीचा चार्ज असलेले संगमनेरचे उपविभागीय अधिकारी मदने यांनी भेटी दिल्या. याप्रकरणाचा अधिक तपास राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष भोये हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या