Friday, April 26, 2024
Homeनाशिकभयंकर ! सलाईनच्या बाटलीत आढळले शेवाळ

भयंकर ! सलाईनच्या बाटलीत आढळले शेवाळ

सातपूर । Satpur

पाथर्डी फाटा दामोदर चौक विक्री कर भवन समोरील एकविरा क्लिनिक मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला सलाईन लावत असताना सलाईन मध्ये दूषित शेवाळ आढळून आले. रुग्णाच्या नातेवाईकांनी ती लावण्यास मज्जाव केला व औषध प्रशासनाला कळवून सदर सलाईन जप्त करण्यात आली. त्यामुळे रुग्णांवरील गंभीर प्रसंग टळला आहे.

- Advertisement -

पाथर्डी फाटा दामोदर चौक विक्रीकर भवन समोरील एकविरा क्लिनिकचे संचालक डाॅ. गुणेश शिरसाठ यांच्या क्लिनिक मध्ये पेशंट गेले आसता पेशंट ला अशक्त पणाचा त्रास वाटत असल्यामुळे डॉक्टरांनी सलाईन घ्यावी लागेल असा सल्ला दिला होता.

सदर घटना हि रविवारी (दि १३) रात्री ९ ते ९.३० ची आहे. त्यात पेशंटला एक छोटीशी सलाईन बाटली लावण्यात आली. नंतर दुसरी एक मोठी सलाइन बाटली लावण्यासाठी घेतली असता.त्या बाटली मधे जंतू व शेवाळे असल्याचे पेशंट च्या नातेवाईकाच्या लक्षात आले.

डॉक्टरांनी ती सलाईन लावू नये असे सुचीत केले. कंपनीला कमवण्याच्या नावाखाली सदरची सलाईन डॉक्टरांनी त्यांच्या केबिन मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याना पेशंट ने हस्तक्षेप केला. डॉक्टरांनी ती सलाईन पेशंटला दाखवली.

पेशंट च्या नातेवाईकांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क करून घटनेची माहीती दिली. अधिकाऱ्यांनी तातडीने पुढील कार्यवाही केली.

अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार एकवीरा क्लिनिक येथून सलाईन चे संपल्स ताब्यात घेण्यात आली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जबाब नोंद घेण्यात आले आहेत. तसेच पुरवठा करणाऱ्या समर्थकृपा एजन्सी सातपूर येथे छापा टाकण्यात आला असून, त्यांच्याकडून सदर कंपनीच्या इतर सलाईन नाही तपासण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर कंपनीच्या सलाईन गोदामात नसल्याने बाजारपेठेतील सलाईन गोळा करण्याच्या सूचना देण्यात आले असल्याचे समजले.

तपासणी अहवाल आल्यानंतर कडक कारवाई

याबाबत नमुने ताब्यात घेण्यात आली असून तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत प्रयोगशाळेच्या अहवालानंतर सदर उत्पादन कंपनी व पुरवठादार एजन्सीवर कारवाई केली जाणार आहे.

-सुरेश देशमुख, औषध निरीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या