Friday, April 26, 2024
Homeनगररस्त्याची जागा गहाण ठेवून घेतले कर्ज

रस्त्याची जागा गहाण ठेवून घेतले कर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बोल्हेगावातील बिनशेती झालेल्या व रस्त्याचे क्षेत्र म्हणून नोंद झालेल्या जागेचे गहाणखत करून पतसंस्थेने 40 लाखांचे कर्ज दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तेथील प्लॉट धारकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली आहे. मनपात सलग महिनाभर धरणे आंदोलनामुळे वादग्रस्त ठरलेली ती जागा पुन्हा चर्चेत आली आहे.

- Advertisement -

1996 साली बिनशेती झालेल्या जागेचा जुना शेत जमिनीचा उतारा महसूल विभागाने बंद न केल्याने वाद निर्माण झाला आहे. एकाच जागेचे दोन उतारे चालू असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर व या रस्त्याच्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्यावर महिनाभर आंदोलन झाले. त्यानंतर मनपाने या जागेवर स्वत:चे नाव लावण्याचा प्रस्तावही दिलेला आहे. मात्र, आता या जागेवर एका पतसंस्थेने गहाणखत करून 40 लाखांचे कर्ज एका व्यक्तीला दिल्याची तक्रार तेथील प्लॉट धारकांनी केली आहे.

रस्त्याचे क्षेत्र असलेला उतारा चालू असतानाही दुसरा उतारा वापरून त्याचे गहाणखत करून कर्ज प्रकरण करण्यात आले आहे. याची चौकशी करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या