Thursday, April 25, 2024
Homeनाशिकएच.ए.एल सोसायटीच्या चेअरमनपदी मोरे

एच.ए.एल सोसायटीच्या चेअरमनपदी मोरे

ओझर। वार्ताहर | Ozar

येथील एच.ए.एल एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या (HAL Employees Co.Op. Credit Society) चेअरमनपदी संजय मोरे (Sanjay More as Chairman) यांची तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र मोरे यांची बिनविरोध निवड (Uncontested choice) झाली.

- Advertisement -

संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत (election) सत्ताधारी गटाच्या समृद्धी पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवून सत्ता पुन्हा काबीज केली. त्यानंतर चेअरमन, व्हा. चेअरमन पदाच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधलेखन रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमनपदासाठी संजय त्र्यंबक मोरे यांचे नाव हेमंत अहिरराव यांनी सुचविले.

त्यास राहूल जगताप यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी राजेंद्र गणपत माळी यांचे नाव अरूण लोणे यांनी सुचविले. त्यास अनुमोदन चिंतामण थिटे यांनी दिले. या दोन्ही पदासाठी दुसरे नाव आले नाही. त्यामुळे चेअरमनपदी संजय मोरे यांची तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र माळी यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी रणजित पाटील (Election Officer Ranjit Patil) यांनी जाहिर केले.

याप्रसंगी संचालक हेमंत दिनकर अहिरराव, जयंत विनायक मेघणे, चिंतामण लालचंद थिटे, दीपक सदाशिव पाटील, संदिप वसंत मराठे, अरुण नानासाहेब लोणे, शरद वाळू शिंदे, जयंत शिरीष गवळी, राहूल विजय जगताप, मिराज अरुण रत्नपारखी, यतीश सुभाष गोंदके, शुभदा सुहास शंखपाळ, स्वर्णलता दीपक बन्नापुरे उपस्थित होते. मोरे आणि माळी यांची निवड जाहिर होताच सभासदांनी कार्यालयाबाहेर गुलाल उधळून पेढे वाटून जल्लोष केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या