Friday, April 26, 2024
Homeजळगावभडगाव : भाजपने केली विजबीलांची होळी

भडगाव : भाजपने केली विजबीलांची होळी

भडगाव – Bhadgaon

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज भडगाव येथे भरमसाठ विजबिल तसेच महावितरणच्या वतीने होणाऱ्या सक्तीच्या वसुलीविरोधात तहसिल कार्यालयाच्या चौकात विजबिलांची होळी तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, मा.तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, सरचिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

- Advertisement -

लॉकडाऊन काळात भरमसाठ विजबिल आले. त्याविरोधात जनआक्रोश निर्माण झाल्यावर सरकारने सवलत देण्याचे जाहिर केले. पण उर्जामंत्र्यांनी विजबीलाबाबत दिलासा देता येणार नाही, असे सांगून महावितरण सक्तीने वसुली सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले.

यावेळी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात, १०० युनिटपर्यंतचे विजबील माफ करण्यात यावे. सरासरी विजबीलांची दुरूस्ती करण्यात यावी. लॉकडाऊन काळातील ३०० युनिट पर्यंतचे विजबील माफ करावे व शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा किमान ८ तास विज उपलब्ध करून देण्यात यावी या मागण्यांचा समावेश असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा ईशारा शासनाला देण्यात आला आहे.

या आंदोलनप्रसंगी बन्सीलाल परदेशी, प्रदिप कोळी, रमेश माळी सर, भगवान शिंदे, लक्ष्मण पाटील, किरण शिंपी, शेखर बच्छाव, हेमंत पाटील, प्रदिप सोमवंशी, शुभम सुराणा, नितीन महाजन, महेंद्र ततार, नामदेव मालचे, अशोक पाटील, युवराज पाटील, मनोहर चौधरी, अनिल महाजन, विजय वाणी, प्रविण कापुरे, सोनु महाजन, ओम पाटील इ.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या