Thursday, April 25, 2024
Homeनगरलोहगावात मंदिरातील दानपेटी फोडली

लोहगावात मंदिरातील दानपेटी फोडली

नेवासा (तालुका प्रतिनिधी) / Newasa – तालुक्यातील लोहगाव (lohagaon) येथील मारुती मंदिर-भारती बाबा समाधी परिसरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यानी अंदाजे 30 हजाराची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवार दि.29 जुन रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडली आहे.

दानपेटी फोडण्या बरोबरच चोरट्यानी भजनी मंडळ साहित्य ठेवण्याच्या ठिकाणची खोलीचेह कुलूप ही त्रिशूळ घालून तोडले व साउंड सिस्टिमचे नुकसान केले. दोन कॉडलेस माईक (Cordless Microphones) ही चोरट्यांनी लांबिवले आहे.

- Advertisement -

‘करोना आणि ऑक्सिमीटर’

सायंकाळी हरिपाठ करण्यासाठी आलेल्या भजनी मंडळी व दिवा बत्ती करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर याठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली.सदर घटनेची माहिती सोनई पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना देण्यात आली.

संगणकावर काम करताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

सदर चोरीच्या घटनेचा लवकरात लवकर तपास व्हावा अशी मागणी लोहोगाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच आदिनाथ पटारे , बाप्पूराव कल्हापुरे उपसरपंच निसार सय्यद , जालिंदर ढेरे , अण्णा ढेरे , विकास ढेरे , पोलीस पाटील सोपान ढेरे , सीताराम रावडे , जालिंदर महाराज ढेरे , सुखदेव महाराज ढेरे , दिनकर नागदे , नवनाथ ढेरे , गणेश सिकची आदीसह ग्रामस्थांनी केली आहे .

यापूर्वीही लोहगाव येथील मंदिर परिसरात यापूर्वीही चोऱ्या झाल्या होत्या गेल्या आठवड्यात मंदिर परिसरातील गोडावूनही फोडण्यात आले होते. लोहगाव ता नेवासा येथील मारुती मंदिर परिसरातील दानपेटी फोडून झालेल्या चोरीचा लवकरात लवकर तपास लावून दोषी आरोपींना अटक करण्यात यावे अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत अशी माहिती बाप्पूराव कल्हापुरे , निसार सय्यद , जालिंदर ढेरे , आण्णा ढेरे यांनी दिली.

कांदा खाण्याचे फायदे आणि तोटे

- Advertisment -

ताज्या बातम्या