Friday, April 26, 2024
Homeनगरउसने पैसे परत मागितल्याने नेवाशात वकिलास लोखंडी रॉडने मारहाण

उसने पैसे परत मागितल्याने नेवाशात वकिलास लोखंडी रॉडने मारहाण

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

हातउसने दिलेले पैसे परत मागितल्याने त्याचा राग आल्याने तिघांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना नेवासा येथे घडली. याबाबत पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अक्षय सोपान साळवे (वय 27) धंदा- वकील यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 29 सप्टेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास मी माझ्या राहत्या घरी दरवाजामध्ये उभा असताना माझा मेव्हणा विवेक वसंत पाटोळे, त्याची आई मंदा वसंत पाटोळी व त्याची पत्नी अंजली विवेक पाटोळे (सर्व रा. जेऊर बायजाबाईचे ता. नगर) हे स्विफ्ट डिझायर कारमधून (एमएच 16 सीवाय 7992) घरासमोर आले. त्यातील विवेक वसनत पाटोळे याने कयरे माजलास का? मला पैसे मागतो का? असे म्हणून लोखंडी रॉडने गुडघ्यावर जबर मारहाण करुन फ्रॅक्चर केले.

त्यावेळी मी खाली पडलो. त्यावेळी मंदा वसंत पाटोळे व अंजली विवेक पाटोळे यांनी मला शिवीगाळ करुन त्या दोघींनी माझे दान्ही हात दाबून धरुन विवेकने लोखंडी रॉडने माझ्या पाठीत व डाव्या मांडीवर मारहाण केली. तुला आताच जीवे ठार मारुन टाकतो असे म्हणून लोखंडी रॉड डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली.

माझी पत्नी दिव्या मला सोडविण्यासाठी मध्ये आली असता तिघांनीही तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ते निघून गेले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी तिघांवर भारतीय दंड विधान कलम 307, 326, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. मोंढे करत आहेेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या