देवळाली गावात सोमवार आठवडे बाजार सुरुच

jalgaon-digital
1 Min Read

नाशिकरोड । Nashik

करोना संसर्गाला प्रतिबंधासाठी प्रशासनाने आठवडे बाजार बंद केले असतानाही देवळाली गावातील अनेक वर्षे जुना असलेला आठवडे बाजार आजही भरला होता.

व्यावसायिक आणि ग्राहकांनी गर्दी केली होती. त्यामुळे प्रशासनाने जे नियम व अटी लागू केल्या आहेत त्यात नाशिक रोड परिसरात काही फरक पडला नसल्याचे जाणवते. सोमवारचा आठवडे बाजार सकाळी सुरू झाला.

विहीतगाव, शिंदे, पळसे, सिन्नर, लहवित आदी भागातील शेतकरी व इतर विक्रेते आले. महापालिकेचे कर्मचारी आले व विक्रेत्यांना सूचना करुन गेले. त्यांची पाठ फिरल्यानंतर पुन्हा भाजीबाजार जैसे थे सुरु राहिला.

विक्रेत्यांचे प्रबोधन करुन आणि करोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात आणून देऊन बाजार काही दिवस बंद ठेवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *