Saturday, April 27, 2024
Homeनगरसोमवारी 1209 शाळांची वाजणार घंटा

सोमवारी 1209 शाळांची वाजणार घंटा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबतच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार

- Advertisement -

जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागाने स्थानिक पातळीवर तयारी सुरू केली आहे. सोमवारपासून जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या 1 हजार 209 शाळा सुरू करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षण विभागाने संबंधित शाळा व्यवस्थपानाला दिल्या आहेत.

जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत 1 हजार 209 शाळा असून त्यात सुमारे 2 लाख 84 हजार विद्यार्थी आहेत. या शाळांमध्ये सुमारे 10 हजार शिक्षक व 6 हजार शिक्षकेतर कर्मचारी असा एकूण 16 हजार 709 कर्मचार्‍यांचा स्टाफ आहे. सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने तशी तयारी सुरू केली आहे.

प्रथम सर्व शिक्षकांची कोव्हिड चाचणी करण्याचे काम सुरू आहे. शाळा सॅनिटायझेशन, तसेच इतर स्वच्छता शाळांनी आपापल्या पातळीवर सुरू करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.पालकांचे संमतीपत्र घेऊन शाळा सुरू

जिल्हा प्रशासनाकडून दक्षतेचे आदेश

सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वत: सूचना जारी केल्या आहेत. यात शाळेचा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणे, विद्यार्थी मास्कची अदलाबदल करणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, विद्यार्थ्यांशिवाय अन्य कोणालाही शाळेत प्रवेश देऊ नये, विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षीत ठेवण्यात यावा, सामाजिक अंतर पाळण्यात यावे, वर्ग खोल्यांच्या सुरक्षा मानांकाची खात्री करावी, दररोज 50 टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवण्यात यावी, अभ्यास वर्गाची व्यवस्था करावी, चिंता व निराश या मानसिक समस्या असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करावी, यासह अन्य आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या