Friday, April 26, 2024
Homeजळगावकटुलेचा तोरा फार ; भाव गेला दोनशे पार !

कटुलेचा तोरा फार ; भाव गेला दोनशे पार !

जळगाव – Jalgaon :

पावसाळा सुरू झाला की श्रावण भाद्रपद महिन्यात हमखास खावीशी वाटणारी रानभाजी बाजारात दाखल होते ती कितीही महाग असली तरी तिचा मोह काही सुटत नाही . हिरव्यागार टवटवीत कटूरल्याच हेच होते. कटूरले, कटीरले, करटोली, रान कारली, कंकोरटी अशा विविध नावांनी परिचीत असलेली ही रानभाजी महाराष्ट्रात डोंगराळ भागात सर्वत्र आढळते.

- Advertisement -

या रानभाजीचे शास्त्रीय नाव आहे “मोमार्डीका डायओयिका(momordica dioica) किंवा वाईल्ड करेला फ्रुट असेही म्हटले जाते.खान्देशात या भाजीची लागवड होत नाही. पहिल्या पावसानंतर गवताबरोबर कटूरल्याचे वेल वाढत जातात आणि डोंगराळ भागात झाडाझुडपावर ते वाढतात. जाणकारांच्या मते या भाजीचे कंद जमिनीत असतात व पावसाळ्यात त्यांना पालवी फुटते आणि लगेच फळधारणा होते. भोपळा कुळातील ही वनस्पती असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.जून ते ऑगस्ट यतीन चार महिन्यातच ही रानभाजी उपलब्ध होते.

डोकेदुखी, मुतखडा आणि मधुमेह या आजारावर ही रानभाजी उपयुक्त असल्याचे जाणकार सांगतात. जळगाव आणि परिसरात बाजारपेठेत या कटूरल्याचे आगमन झाले असून भाव मात्र तगडा आहे. दीडशे ते दोनशे रुपये किलो असा भाव असल्याने खवय्यांची पंचाईत झाली आहे . आवक वाढली की दर खाली आल्यावर सर्वसामान्य ग्राहकाला कटूरले परवडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या