Thursday, April 25, 2024
Homeनाशिकम्हसरूळला महिलेचा विनयभंग

म्हसरूळला महिलेचा विनयभंग

नाशिक | Nashik

दरवाजात उभ्या असलेल्या महिलेचा हात पकडून एकाने तीचा विनयभंग केल्याची घटना गुरूवारी (दि.१) सकाळी म्हसरूळ येथे घडली.

- Advertisement -

अरूण नंदु जाधव (३०, रा. म्हसरूळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी पिडीतेने तक्रार दिली असून त्यानुसार पिडीता ही आपल्या घराच्या दरवाजात उभी असताना तेथून जात असलेला संशयित जाधव अचानक तीच्या जवळ येऊन तीचा हात धरून तीचा विनयभंग केला. तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरिक्षक भडीकर करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या