Saturday, April 27, 2024
Homeनगरअल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर|Ahmedagar

खाजगी क्लासवरून सायकलवर घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या

- Advertisement -

आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी सुरज राजेंद्र गुलदगड (रा. नगर) याच्याविरूद्ध भादवि कलम 354, 341, 504, 506 सह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत अल्पवयीन मुलगी राहत असलेल्या परिसरात आरोपी सुरज गुलदगड हा राहत होता. पिडीत मुलगी त्याला ओळखते. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पिडीता खाजगी क्लासवरून कॉटेज कॉर्नर ते भिस्तबाग रोडने घरी जात असताना सुरजने त्याची दुचाकी पिडीताच्या सायकलला आडवी लावली. सुरज तिच्या जवळ आला व तिला म्हणाला, चल आपण राहुरीला जाऊ. यावेळी पिडीत मुलीने त्याला नकार दिला असताना त्याने बळजबरीने पिडीत मुलीचा हात धरून विनयभंग केला. घडलेली घटना पिडीत मुलीने तिच्या आईला सांगितली. आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गुलदगड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक निरीक्षक किरण सुरसे करीत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या