Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामोहित कंबोजांचा स्ट्राईक रेट १०० टक्के; आशिष शेलारांचं सूचक विधान

मोहित कंबोजांचा स्ट्राईक रेट १०० टक्के; आशिष शेलारांचं सूचक विधान

मुंबई | Mumbai

भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) सध्या राष्ट्रवादीवर निशाणा साधून आहेत. काल तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आजही त्यांनी दोन ट्विट करत राष्ट्रवादीवर (NCP) निशाणा साधला आहे. “हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असं ट्विट करत कंबोज यांनी राष्ट्रवादी विरोधात रनशिंग फुंकलंय.

- Advertisement -

त्यावर आता भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ‘मोहित कंबोज यांचं ट्विट हे त्यांचं मत आहे. पण त्यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे एवढं नक्की. योग्य माहिती असल्याशिवाय ते बोलत नाहीत. संपूर्ण माहितीच्या आधारावरच त्यांनी आतापर्यंत भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडले आहेत. यासाठीच त्यांचं ट्विट हे फार गूढ आहे.’

तसेच, ‘माझं वैयक्तिक मत असं आहे की, कोणी कोणाला जेलमध्ये टाकणं, त्याची तारीख सांगणं याबाबत वक्तव्य करण्यापासून वाचलं पाहिजे. पण मोहित कंबोजांकडे जी माहिती असेल ते ती जाहीर करतील आणि त्याबाबत स्पष्टीकरणही देतील.’ असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या