Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाक्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोर्टाचा दणका!

क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोर्टाचा दणका!

कोलकता | Kolkata

भारतीय क्रिकेट (Indian Cricketer) संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) न्यायालयानं (Court) चांगलाच दणका दिला आहे.

- Advertisement -

न्यायालयानं त्याची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिला दरमहा तब्बल १ लाख ३० लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ, कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

या १ लाख ३० हजार रुपयांमध्ये हसीनला ५० हजार रुपये वैयक्तिक खर्चासाठी आहेत. तर उर्वरित ८० हजार रुपये हे मुलीच्या देखभालीसाठी आहेत. अलीपूर येथील न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. मात्र, हसीन जहाँ या रकमेवर खूश नाही.

कारण त्याने महिन्याला १० लाख रुपयांची मागणी केली होती. २०१८ मध्ये हसीन जहाँने १० लाख रुपये मासिक पोटगीची मागणी करणारी कायदेशीर याचिका दाखल केली होती. हसीन जहाँने याचिकेत म्हटले होते की, तिला वैयक्तिक खर्चासाठी ७ लाख रुपये आणि मुलीच्या संगोपनासाठी दरमहा ३ लाख रुपये पोटगी हवी आहे. हसीन जहाँ आता या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करू शकते.

दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं आयुष्य, धक्कादायक कारण आले समोर

हसीन जहाँ आणि शमी यांची भेट २०११ मध्ये झाली होती. त्या काळात ती IPL टीम कोलकाता नाइट रायडर्ससाठी चीअरलीडिंग करत असे. दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले. हसीन जहाँने लग्नानंतर मॉडेलिंग आणि ऍक्टिंग सोडली होती.

२०१८ मध्ये जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसह अनेक आरोप केले होते. तेव्हापासून दोघे वेगळे राहू लागले आणि तेव्हापासून घटस्फोटाचा खटला सुरू आहे. २०१८ मध्ये, हसीन जहाँने पुन्हा तिच्या व्यवसायात पाऊल ठेवले.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

शमी सध्या न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने धमाकेदार गोलंदाजी केली होती. त्याने ६ ओव्हरमध्ये १८ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या.

दोन्ही संघातील तिसरी आणि अखेरची लढत आज इंदूर येथे होणार आहे. भारताने मालिका आधीच २-० अशी जिंकली आहे. या मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे.

बस दरीत कोसळून भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

- Advertisment -

ताज्या बातम्या