Friday, April 26, 2024
Homeधुळेएरंडोल तालुक्यातील सराईत चोरट्याला मोहाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एरंडोल तालुक्यातील सराईत चोरट्याला मोहाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

धुळे – प्रतिनिधी dhule

येथील मोहाडी उपनगर पोलिसांनी (police) धुळे तालुक्यातील मोघन व एरंडोल पोलिसात दाखल ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे. एरंडोल (Erandole) तालुक्यातील बाम्हणेतील सराईत चोरट्याला जेरबंद केले असून त्यांच्याकडून साडेअकरा लाखांचे दोन ट्रॅक्टरसह एक ट्रॉली जप्त करण्यात आली.

- Advertisement -

याबाबत आज पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रपरिषदेत माहिती देत मोहाडी पोलिसांचे कौतूक केले. धुळे तालुक्यातील मोघन येथील रहिवासी अमृत खेमचंद पाटील यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (क्र.एमएच १८ एन ९०८९) व ट्रॉली (क्र.एमएच १८ एन ९७८५) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी दि.१८ मार्च रोजी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मोहाडी पोलिस ठाण्याचे सपोनि भुषण कोते यांनी तपास पथक तयार केले. गुन्ह्याचा तपास सुरु असतांना झोडगे येथील भारत पेट्रोल पंपावर गुन्ह्याच्यावेळी अज्ञात इसमाने कॅनमध्ये डिझेल विकत घेतल्याची माहीती मिळाली. त्याठिकाणच्या तांत्रिक पुराव्याच्या विश्‍लेषनाच्या आधारे हा गुन्हा प्रविण संभाजी पाटील (वय ३२ रा.बाम्हणे ता.एंरडोल जि.जळगाव) याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले.

लॅपटॉप भंगार व्यवसायिकाकडे विकण्यापूर्वीच चोरटा जेरबंद

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. प्रविण हा सराईत गुन्हेगार असून पोलीस कोठडीत त्याकडे कसुन चौकशी केली असता त्यांने एंरडोल पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्हयातील सोनालीका कंपनीचे निळया रंगाचे ट्रॅक्टर देखील चोरी केल्याचे कबुली दिली. त्याच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे स्वराज ७४४ कंपनीचे ट्रॅक्टर (क्र.एमएच १८-एन-९०८९), एक लाखाची ट्रॅक्टरची लोखंडी ट्रॉली (क्र. एमएच १८-एन-९७८५) व ७ लाखांचे सोनालीका कंपनीचे निळया रंगाचे ट्रॅक्टर असा एकुण ११ लाख ५० हजार रूपये किंमतीचे दोन ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली.

दोंडाईचात ऑनलाईन जुगार ; चौघांवर गुन्हा

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे एपीआय भुषण कोते यांच्या नेतृत्वाखाली असई अशोक पायमोडे शाम निकम, संजय पाटील, पोना किरण कोठावदे, राहुल पाटील, पोकॉ जितेंद्र वाघ, बापुजी पाटील, मुकेश मोरे, जयकुमार चौधरी, चेतन सोनगीरे, प्रितेश चौधरी, विकास शिरसाठ, चेतन माळी यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या