Friday, April 26, 2024
Homeनगरसौताडा रोडवर मोहा शिवारात एसटीवर दगडफेक

सौताडा रोडवर मोहा शिवारात एसटीवर दगडफेक

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. असे असताना सुरू असणार्‍या एसटी बसवरील हल्ले थांबायला तयार नाहीत. जामखेड-सौताडा रोडवरील मोहा शिवारात पाटोदा आगाराच्या बसवर गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटला नसला तरी मात्र कारवाईच्या भीतीपोटी या संपाला विरोध करत अनेक बस चालक व वाहक कामावर हजर झाले आहेत. मात्र अशा हल्ल्यामुळे ते भितीच्या सावटाखाली काम करत आहेत. गुरूवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाटोदा अगाराची पुणे- पाटोदा बस क्रमांक एम. एच 20 बी. एल. 3972 ही चालली होती. याच दरम्यान सौताडा रोडवर ही बस आली असता अंधाराचा फायदा घेत मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी या बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचेचे नुकसान झाले आहे. यानंतर तातडीने जामखेड पोलीस स्टेशनला आणत तक्रार दाखल केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या