Friday, May 10, 2024
Homeनगरमोधळवाडीच्या शिंदे कुटुंबियांचे ना. थोरातांकडून सांत्वन

मोधळवाडीच्या शिंदे कुटुंबियांचे ना. थोरातांकडून सांत्वन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

पठार भागातील पिंपळगाव देपा अंतर्गत असलेल्या मोधळवाडी येथील शिंदे परिवारातील बहिण-भाऊ यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या कुटुंबियांची भेट घेऊन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांत्वन केले आहे.

- Advertisement -

मोधळवाडी येथील शिंदे कुटुंबीयांच्या घरी जाऊन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे सांत्वन केले. या प्रसंगी सभापती शंकरराव खेमनर, सौ. मिराताई शेटे, किरण मिंडे, जयराम ढेरंगे, ज्ञानदेव मिंडे, प्रदिप पुंड व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

मोधळवाडी येथील घाणे वस्तीवर चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबीयांसमवेत रहात असून त्यांची मुलगी जयश्री (वय 21) व मुलगा आयुष्य (वय 7) हे दोघे शेततळ्याच्या कडेला धुणे आणण्यासाठी गेले होते. यावेळी लहानग्या आयुषचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मोठी बहीण जयश्री येणे शेततळ्यात उडी मारली. मात्र दोघेही पाण्यात बुडाली आणि दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण पठार भागात अत्यंत दुःखाचे वातावरण निर्माण झाले.

समाजातील सर्व घटकांच्या व गोरगरिबांच्या विकासासाठी काम करत असलेले राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी आपले महत्त्वाचे कार्यक्रम रद्द करून मोधळवाडी येथे जाऊन या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी ते म्हणाले अशा कठीण प्रसंगातून जाताना सर्वांनी या शिंदे कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहावे. या दुःखद प्रसंगात नव्हे तर या पुढील काळातही सर्वांनी त्यांना भक्कम आधार द्यावा. असे सांगताना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. याप्रसंगी मोधळवाडी, पिंपळगाव देपा व पठार भागातील अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ शिंदे वस्तीवर उपस्थित होते. नामदार थोरात यांनी केलेल्या सांत्वनामुळे शिंदे कुटुंबीयांना गहिवरुन आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या