Friday, April 26, 2024
Homeनाशिकमहामार्ग बसस्थानकाचे लवकरच आधुनिकीकरण- खा. गोडसे

महामार्ग बसस्थानकाचे लवकरच आधुनिकीकरण- खा. गोडसे

नाशिक। प्रतिनिधी Nashik

शहरातील मुंबई नाका परिसरातील महामार्ग बस स्टॅन्डचे आधुनिकिकरण क्याच्या उद्देशाने महामंडळाचे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट त्यांना संकल्पना स्पष केली महामार्ग बस स्टॅडचे आधुनिकीकरण करण्यासाठी महामंडळ प्रशासन सकारात्मक असून, लवकरच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप(पीपीपी) तत्वावर आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचे खा. हेमंत गोडसेयांनी सांगितले.

- Advertisement -

महामार्ग बस स्थानकाचे आधुनिकरण होणार असून त्यात महामंडळाचे प्रशस्त प्रशासकीय कार्यालय, मॉल, रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर, प्रवाशांसाठी वातानुकूलित वेटिंग रूम, पुरुष आणि महिला प्रवाशांसाठी स्वंतत्र रांगा, शौचालये आदी आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या आधुनिकीकरणामुळे महामार्ग बसस्टॅडचे रुपडे बदलून त्याला नव्याने झळाळी मिळणार असल्याचे खा. गोडसे यांनी सांगितले.

मुंबई पुण्यापाठोपाठ झपाटयाने विकसित होणारे नाशिक हे शहर आहे. मुंबई-पुणे-नाशिक हा विकासासाठीचा सुवर्ण त्रिकोण आहे. वणी येथील सप्तशृंगी माता मंदिर,त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकेश्वर मंदिर, शहरातील काळाराम मंदिर, तपोवन, पंचवटी आदी प्रख्यात धार्मिक स्थळे शहर परिसरात असल्याने धार्मिक पंढरी अशी देशभरात नाशिकची ओळख आहे. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोकण, जळगाव, धुळे,अहमदनगर सोलापूर, तुळजापूर , सुरत , अहमदाबाद आदी ठिकाणांहून रोज नाशिक शहरात बसने सुमारे वीस हजार प्रवाशी प्रवास करीत असतात.यातूनच शहरातील महामार्ग बस स्टॅडच्या अधुनिकीकरणाचा विषय पुढे आला आहे.

महामार्ग बस स्टँड आधुनिकरण व्हावे यासाठी शहरातील नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांकडून आलेल्या सूचनांची दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी मंत्रालयात एसटी महामंडळाचे राज्याचे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेतली. महामार्ग बसस्टॅडच्या आधुनिकीकरणासाठी तयार केलेले डिझाईन वजा नकाशा यावेळी गोडसे यांनी जैन यांच्यासमोर सादर केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीकडून महामार्ग बसस्थानकाचे विकसन करून प्रायव्हेट पार्टनर (पीपीपी) तत्वावर चालविणे सहज शक्य होणार असल्याचे खा.गोडसे यांनी जैन यांच्या लक्षात आणून दिले.जैन यांना गोडसे यांचा प्रस्ताव भावल्याने त्यांनी लगेचच प्रस्तावास सकारात्मकता दर्शविली.आपला प्रस्ताव योग्य असून बसस्थानकाच्या अधिनिकीकरणासाठी लवकरच योग्य ते पावले उचलणार असल्याची ग्वाही जैन यांनी गोडसे यांना दिले आहे.सरकार आणि प्रशासनाच्या सकारात्मक भुमिकेमुळे आता लवकरच महामार्ग बसस्थानकाचे रूपडे पालटणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.

महामार्ग बस स्टँड आधुनिकरण व्हावे यासाठी शहरातील नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांकडून आलेल्या सूचनांची दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी मंत्रालयात एसटी महामंडळाचे राज्याचे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेतली. महामार्ग बसस्टॅडच्या आधुनिकीकरणासाठी तयार केलेले डिझाईन वजा नकाशा यावेळी गोडसे यांनी जैन यांच्यासमोर सादर केला.

नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीकडून महामार्ग बसस्थानकाचे विकसन करून पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर चालविणे सहज शक्य होणार असल्याचे खा.गोडसे यांनी जैन यांच्या लक्षात आणून दिले.जैन यांना गोडसे यांचा प्रस्ताव योग्यअसल्याचा निर्वाळा देत लवकरच योग्य ती पावले उचलणार असल्याची ग्वाही जैन यांनी गोडसे यांना दिली. सरकार आणि प्रशासनाच्या सकारात्मक भुमिकेमुळे आता लवकरच महामार्ग बसस्थानकाचे रूप पालटणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या