Thursday, April 25, 2024
Homeनाशिकआदिवासींकडून आधुनिक शेतीची कास

आदिवासींकडून आधुनिक शेतीची कास

ननाशी । प्रतिनिधी | Nanashi

दिंडोरी तालु्यातील (dindori taluka) पश्चिम भाग म्हणजे आदिवासी अतिदुर्गम भाग (tribal area) समजला जातो.

- Advertisement -

त्यामुळे इतर बाबी प्रमाणेच शेतीमध्ये ही काहीसा मागासलेला गणला जातो. अतिपर्जण्याचा परिसर त्यामुळे वर्षभरातील पावसाच्या (rain) पाण्यावर अवलंबून असणारे भात, नागली, वरई, उडीद कुळीद असे मोजकेच पीक घेऊन गुजराण इथला आदिवासी शेतकरी!

पण गेल्या दहा वर्षांपासून वाहुन जाणारे पाणी वळण बंधार्‍याच्या माध्यमातून अडवून शेतीसाठी सिंचनाच्या सोयी (Irrigation facilities) उपलब्ध झाल्या मुबलक प्रमाणात पाण्याच्या आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या (Modern Agricultural Technology) सुविधा मिळाल्याने याचं भागातील शेतकर्‍यांनी (farmers) आता भरघोस उत्पादन देणार्‍या आधुनिक नैसर्गिक शेतीची (Natural farming) कास धरली आहे.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे तालुक्यातील पश्चिम भागातील पळस येथील नाविन्याचा मनी ध्यास घेतलेले प्रयोगशील शेतकरी शाम गायकवाड! श्याम गायकवाड यांची वनारे शिवारात चार एकर शेती असून ते शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून चांगले उत्पन्न घेत आहेत. त्याबरोबरच रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) व कीटकनाशकांचा (Pesticides) वापर कमीत कमी करून विषमुक्त अन्न या संकल्पने अंतर्गत काम करत आहेत.

श्याम गायकवाड यांच्याकडे सध्या विदेशी म्हणजेच झुकिनीची (Zucchini) दहा गुंठे क्षेत्रावर लागवड केलेली आहे. त्यामध्ये हिरवी व पिवळी अशा दोन प्रकारच्या झुकीनीचे उत्पादन ते घेतात. दहा गुंठ्यासाठी त्यांना साधारणत: दहा हजार रुपये उत्पादन खर्च आलेला आहे. झुकिनीला सरासरी 50 रुपये किलो दर मिळतो. ही झुकिनी ते पुणे येथील बाजापेठेत विक्री करतात.

दहा गुंठे मधून त्यांना ते सव्वा लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. देशी भाजीपाल्यामध्ये एक एकर दोडके व टोमॅटोची (tomato) लागवड त्यांनी केलेली आहे. दोडके पिकामध्ये त्यांनी कोबी व कोथिंबीरीचे आंतरपीक घेऊन एक वेगळा प्रयोग देखील केलेला आहे. कोबी व कोथिंबिरी मधून दोडक्याचा उत्पादन खर्च सहज निघणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

आदिवासी भागातील (rural area) मुख्य पारंपारिक भात पिकामध्ये (Traditional rice crop) सुद्धा श्याम गायकवाड हे वेगळा प्रयोग करतात. यावर्षी त्यांनी एस. आर. टी. पद्धतीने भात लागवड केलेली आहे. एस. आर. टी. पद्धतीने भात लागवड केल्यामुळे मजुरी, बियाणे, खते, अंतरमशागत यावरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली. पारंपारिक शेतीतून मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा दीडपट उत्पन्न जास्त मिळेल असा त्यांचा अंदाज आहे.

पिकासोबतच सोयाबीनची लागवड सुद्धा त्यांनीएस. आर. टी. पद्धतीने रूंद वरंब्यावर केलेली आहे. अतिपावसाच्या प्रदेशात रूंदवरंब्यावर सोयाबीन लागवड केल्यामुळे पीक जोमदार आलेले असुन भरपूर प्रमाणात शेंगा आलेल्या आहेत. सोयाबीन लागवडीतून सुद्धा त्यांना चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.

हे सर्व करत असताना रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) व कीटकनाशकांचा (Pesticides) कमीत कमी वापर ते बिजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क, जिवाणू खते, जैविक कीटकनाशके यांचा ते मोठ्या प्रमाणात वापर करतात. नैसर्गिक शेतीचे (Natural farming) तत्व ते पूर्णपणे पाळतात. या कामात त्यांच्या अर्धांगिनी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून शेतात राबत असतात. दरम्यान यातून एक बाब निश्चित अधोरेखित झाली आहे की, आदिवासी भागातील शेतकर्‍यांना देखील योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तसेच शेतकर्‍यांनी प्रबळ इच्छाशक्ती आणि चिकाटी ठेवली तर यशाला गवसणी घालणे सहज शक्य होते.

अशाप्रकारे दुर्गम भागात सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान (Modern technology), नैसर्गिक साधनसामग्री, अभ्यास व कल्पकता या चतु:सुत्रीचा सुरेख संगम साधून श्याम गायकवाड हे शेतीतील नवनवीन प्रयोग यशस्वीरित्या राबवीत आहेत. या कामात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील अधिकारी, यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. यापुढेही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आपल्या परिसरातील शेतकर्‍यांपुढे एक चांगला आदर्श ठेवणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

प्रदर्शनात सहभाग

दरम्यान शाम गायकवाड यांच्या दोन्ही प्रकरातीलील झुकेनी काकडीची जिल्हा कृषी अधिकारी नासिक यांनी दखल घेतलि असून तालुक्यातून मा दोन विदेशि काकडीची निवड झाली असून येथे 31 ऑक्टोबर पूणे येथे होणार्‍या कृषि प्रदर्शनात तालुका कृषी अधिकारी दिंडोरी यांच्या नेतृत्वाखाली विदेशी भाजी झुकेनि प्रदर्शनात सहभागी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या