Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारअधिकार्‍यांवर कारवाईचा इशारा

अधिकार्‍यांवर कारवाईचा इशारा

मोदलपाडा, ता.तळोदा – Nandurbar – वार्ताहर :

तळोदा येथील पंचायत समितीच्या बैठकांना वारंवार गैरहजर राहणार्‍या वनविभाग, महावितरण कंपनी व आदिवासी प्रकल्पातील अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा आढावा बैठकीत करण्यात आला.

- Advertisement -

तळोदा पंचायत समितीच्या आढावा बैठकीत नेहमीप्रमाणे वनविभाग, आदिवासी प्रकल्प विभाग व महावितरण विभागाच्या अधिकार्‍यांनी दांडी मारली. म्हणून पं.स.सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

याबाबत सभापती यशवंत ठाकरे यांनी गैरहजर असणार्‍या विभाग प्रमुखांबाबत ठराव करून त्या विभागांना नोटीस पाठविण्याचे संकेत दिले.

या बैठकीला व्यासपीठावर सभापती यशवंत ठाकरे, उपसभापती लताबाई पाडवी, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहाय्यक गटविकास अधिकारी बी.आर.सोनवणे आदी उपस्थित होते.

तळोदा पंचायत समितींतर्गत येणार्‍या सर्व विभागाची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी 11 वाजता घेण्यात आली.

यावेळी पंचायत समिती सदस्य विजयसिंह राणा, सुमनबाई वळवी, चंदन पवार, इलाबाई पवार, सोनीबाई पाडवी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, तालुका आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका कृषी विभाग, बालविकास प्रकल्प विभाग या विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी सभापती ठाकरे म्हणाले की, वनविभाग, महावितरण विभाग, आदिवासी प्रकल्प विभाग हे विभाग सलग तीन मासिक बैठकांंमध्ये गैरहजर राहत असल्याने त्यांना या अगोदर दोन वेळा नोटीस देऊनही ते अथवा त्यांचे प्रतिनिधीदेखील हजर राहिले नाहीत.

म्हणून आता या तिन्ही विभागांबाबत ठराव करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. पं. स.च्या अंतर्गत येणार्‍या सर्व विभागातील अधिकार्‍यांनी आवर्जून या मासिक मिटींगला हजर राहिले पाहिजे, जेणेकरून ग्रामीण भागामधील ज्या काही योजना असतील किंवा काही समस्या असतील त्या आमच्या पर्यंत येतात व त्यावर आम्ही तात्काळ उपाययोजना करून किंवा संबंधित विभागाला सूचना देऊन त्या मार्गी लावण्याचे काम केले जात असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या