Thursday, April 25, 2024
Homeजळगावआग विझविण्यासाठी शासकीय महाविद्यालयात मॉकड्रील

आग विझविण्यासाठी शासकीय महाविद्यालयात मॉकड्रील

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आग लागल्यानंतर करायच्या प्रतिबंधात्मक बाबींचे प्रात्यक्षिक (मॉकड्रील) मंगळवारी महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे दाखविण्यात आले.

- Advertisement -

यावेळी महाविद्यालयातील डॉक्टर्स, परिचारिका यांनी सक्रिय सहभाग घेत आग विझविण्याचे धडे देत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

राज्यात हॉस्पिटलना आग लागून रुग्णांना होरपळून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे उपस्थितांना आग लागल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या यंत्रणेद्वारे आग कशी विझवावी याबाबत प्रशिक्षण नसते.

त्यामुळे मंगळवारी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महापालिकेच्या अग्निशामन विभागाकडून आग विझविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

सुरुवातीला अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, फायरमन अश्वजीत घरडे, नितीन बारी, तेजस जोशी यांनी उपस्थित यंत्रणेला आग प्रतिबंधनाची सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर आग कशी लागते, त्याचे प्रकार किती तसेच आग विझविण्याच्या पद्धती सांगितल्या. आग लागल्यानंतर आग विझविण्याचे उपकरण कसे वापरावे त्याची माहिती दिली.

यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. विलास मालकर, अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहाय्यक अधिकारी सुनील मोरे उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. इम्रान पठाण, डॉ. इम्रान तेली, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. अलोक यादव, अधिसेविका कविता नेतकर, स्वच्छता निरीक्षक बापू बागलाणे, कर्मचारी ज्ञानेश्वर डहाके, समाजसेवी अधीक्षक संदीप बागूल, मंगेश बोरसे, अरुण हळदे यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, विद्यार्थी परिचारिका, अधिकारी, कक्षसेवक, कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या