Friday, April 26, 2024
Homeनाशिकम्हस्के गँगच्या 20 जणांवर मोक्का प्रस्ताव

म्हस्के गँगच्या 20 जणांवर मोक्का प्रस्ताव

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिकरोड, देवळाली गाव परिसरात दहशत पसरवणार्‍या म्हस्के टोळीच्या 20 सराईतांवर नाशिक शहर पोलीसांनी संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली आहे. यामध्ये 3 विधीसंघर्षीत बालकांचा सामावेश आहे.

- Advertisement -

सागर सुरेश म्हस्के उर्फ सोनु पाईकराव (22, रा. जेलरोड) या टोळीप्रमुखासह रोहित सुरेश लोंढे उर्फ भुर्‍या (21, रा. देवळाली गाव), मारूती वाल्मिक घोरपडे (18, रा. विहितगाव), राहुल भारत तेलोरे (19, रा. विहितगाव), कलाम सलिम राईन (19, जेलरोड), सत्तु बहिरू राजपूत (20, रा. जयभवानीरोड), हर्ष सुरेश म्हस्के (18, जेलरोड), जॉन चलन पडेची (28, रा. देवळाली कॅम्प), योगेश श्रावण बोडके (23, रा. पंचवटी), साहिल सुरेश म्हस्के (20, जेलरोड), आमन हिरालाल वर्मा (35, रा. अंधेरी, मुंबई), अक्षय राजेंद्र पारचे (21, जयभवानीरोड), संदिप अलोकभुवन मनियार (23, रा. राजवाडा, नाशिकरोड), अजय लोहट (23, उपनगर), विजय सरजीत बहेनवाल (रा. उपनगर), शिबान शेख (रा. आर्टिलरी सेंटर रोड), गोलू , बॉबी, (रा. दोघेही देवळाली कॅम्प), पप्पु वाघ, चेतन वाघ (रा. दोघेही उल्लासनगर, मुंबई), नासीर (रा. कल्याण , ठाणे), विनोद व आतिष (दोघे, रा. नाशिक) यांच्यासह 3 विधीसंघर्षीत बालके अशा 20 जणांवर मोक्का प्रस्तावित करण्यात आला आहे.

या टोळीची नाशिकरोड, उपनगर, विहितगाव, उपनगर, देवळाली कॅम्प या परिसरात दहशत आहे. यातील सर्व सदस्यांवर विविध पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.

या टोळीने 16 नोव्हेंबर 2020 रोजी जुन्या भांडणातून तसेच पैशांच्या वादातून देवळाली गाव येथील योगेश पन्नालाल चायल (23) याचा पाठलाग करून कोयता चाकू अशा धारदार हत्याराने वार करून त्याचा खुन केला होता. या खुनाच्या गुन्ह्यात उपनगर पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.

याबात उपनगरचे पोलीस निरिक्षक अनिल शिंदे, सहायक आयुक्त समिर शेख, उपायुक्त विजय खरात यांच्यामार्फत पोलीस आयुक्तांकडे हा प्रस्ताव सादर केला होता. त्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. अधिक तपास सहायक आयुक्त समीर शेख करत आहेत.

शहर गुन्हेगार मुक्त

शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलीसांनी विशेष मोहिम सुरू केली असून कोम्बींग ऑपरेशन, प्रतिबंधक कारवाया, हद्दपारी अशा मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या जात आहेत. पुढील तीन महिन्यात शहर गुन्हेगार तसेच गुन्हेगारी टोळ्यामुक्त करण्याचा पोलीसांचे लक्ष असल्याचे यावेळी बोलताना पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या