Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरझोपलेल्या परप्रांतीयाला लुटणारा ‘तो’ जेरबंद

झोपलेल्या परप्रांतीयाला लुटणारा ‘तो’ जेरबंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्तालुटीच्या अनेक घटना घडत आहेत. नगर येथे पेट्रोलपंपावर ट्रक लावून झोपलेल्या

परप्रांतीयाला मारहाण करत मोबाईल लंपास करणार्‍या भामट्याला एलसीबीने अटक केली. एलसीबीने नगर तालुका पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

- Advertisement -

अविनाश दानियल चौतमल (रा. वाळूंज, औरंगाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मनिषकुमार योगेंद्र यादव (रा. बिहार) यांच्या ड्रायव्हर भावाला 30 सप्टेंबरला मारहाण करत लुटले होते. मालट्रक चालविताना झोप आल्याने पेट्रोलपंपावर थांबवूत यादव झोपले होते. केबिनची काच फोडून मारहाण करत चोरट्यांनी त्यांच्याकडील रोकड व मोबाईल लंपास केला.

या गुन्ह्यातील मोबाईल हा वाळूंज येथील चौतमलकडे असल्याची माहिती एलसीबीचे पीआय अनिल कटके यांना मिळाली. त्यांनी हवालदार बबन मखरे, रविकिरण सोनटक्के, संतोष लोंढे, राहुल साळुंके, जालिंदर माने, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने वाळूंज येथून चौतमलच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरी गेलेला मोबाईल हस्तगत करत त्याला नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.

बड्या आरोपींच्या शोधात

अनेक दिग्गज अधिकारी एलसीबी पीआयच्या रेसमध्ये असताना एसपी मनोज पाटील यांनी कटके यांच्याकडे एलसीबीची धुरा दिली. कटके यांनी छोट्या गुन्ह्याची उकल करतानाच मोठ्या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी कंबर कसली आहे. एसपी पाटील, एएसपी सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे कटके यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या