Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबारावी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल व दप्तर चोरीला

बारावी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल व दप्तर चोरीला

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

इयत्ता बारावीच्या परीक्षा (12th Exams) आजपासून सुरू झाल्या असून यासाठी परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या (Students) दुचाकी गाडीतून दप्तरे व मोबाईल तसेच किमती वस्तू चोरून (Thief) नेण्याचा प्रकार येथील बिटको महाविद्यालयाच्या बाहेर घडला आहे. यामुळे परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे…

- Advertisement -

धक्कादायक! पिंपळगाव बसवंतच्या युवकाची मालेगावात आत्महत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, इयत्ता बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या असून या परीक्षेसाठी (Exam) मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थिनी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी आपल्या दुचाकी गाडी घेऊन येतात. परीक्षा केंद्रावर आल्यानंतर हॉलमध्ये दप्तर तसेच मोबाईल व इतर किमती वस्तू नेण्यास मनाई असल्याने अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या वस्तू गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवतात.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

बोर्डाचा अजब कारभार; बारावीच्या प्रश्नपत्रिकेत आले चक्क उत्तर छापून

विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये बसल्यावर बाहेर येऊ शकत नसल्याने या संधीचा फायदा घेऊन काही भुरटे चोर गाडीची डिकी उघडून त्यामधील मोबाईल तसेच दप्तर चोरून नेतात. असाच प्रकार आज नाशिकरोडला घडला. सुमारे दहा ते बारा विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी मात्र अद्याप कोणी तक्रार दिली नसल्याचे समजते. कारण तक्रार देण्यात बराच वेळ जातो त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही यामुळे विद्यार्थ्यांनी तक्रार दिली नाही, अशी माहिती मिळत आहे.

बारावीच्या विद्यार्थ्याची अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या

तसेच या प्रकारामुळे परीक्षार्थी, विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नेहमी परीक्षेच्या वेळेस असे प्रकार घडतात. यामागे एखादी मोठी टोळी असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.चोरट्यांचा (Thieves) बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकांनी (Parents) व विद्यार्थ्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर उपनगर पोलीस (Police) व बिटको महाविद्यालयाच्या प्रशासनाने परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन केले असून विद्यार्थ्यांनी येतांना किंमती वस्तू मोबाईल आणू नये असे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या