Thursday, April 25, 2024
Homeनगरसिन्नरच्या आरोपीकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

सिन्नरच्या आरोपीकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहर व परिसरातील मोबाईल व इतर चोर्‍यांचा डीवायएसपी राहुल मदने यांच्या पथकाने छडा लावला आहे. सिन्नर तालुक्यातील एका चोरट्यास अटक करून चोरी गेलेल्या 18 मोबाईलसह एक बुलेट दुचाकी असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात या पथकाला यश आले आहे.

- Advertisement -

संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या चोरीचा तपास लावण्यात यश मिळवले आहे. संगमनेर शहर व परिसरातून चोरीस गेलेले मोबाईल व गहाळ झालेले मोबाईल तसेच एक बुलेट मोटार सायकल असा एकूण पाच लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत करून मूळ मालकांच्या ताब्यात मुद्देमाल सपूर्द करण्यात आला आहे.

संगमनेर उपविभागात चोरीचे गुन्हे करणार्‍या गुन्हेगाराची माहिती काढून कारवाई करून गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी राहुल मदने यांना सूचना दिल्या होत्या. या आदेशाप्रमाणे श्री. मदने यांनी उपविभागातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांचे तपास पथक तयार करून त्यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या.

दि. 14 मे रोजी संगमनेर शहरातील आनंद ईश्वरलाल बनभैरु (रा. स्वातंत्र्य चौक, संगमनेर) यांचा व्हिओ वाय 12 हा मोबाईल अज्ञात चोरट्याने काश्मिर हॉटेल समोरुन मोटार सायकलवर येऊन बळजबरीने हिसकावून नेला होता. दि. 14 एप्रिल रोजी नाशिक येथील राहणारे राजेंद्र गोकुळ माळवे यांचा रिडमी कंपनीचा मोबाईल नाशिक हायवे, राजापूर रोड ब्रिज जवळून अज्ञात चोरट्याने मोटारसायकलवर येऊन बळजबरीने चोरून नेला होता.

सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना अजय सोमनाथ पवार (रा. विंचुर दळवी, ता. सिन्नर, जि. नाशिक) याने सदरील गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यास सिन्नर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

संगमनेर शहर व परिसरातून नागरिकांचे महागडे मोबाईल गहाळ होत असल्याने त्या मोबाईलचा शोध लावण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी त्यांच्या पथकास सूचना केल्याने या पथकाने संगमनेर शहर व परिसरातून गहाळ झालेले मोबाईल हस्तगत केले. हस्तगत केलेल्या मोबाईलचा शोध घेऊन मोबाईल मालकांच्या ताब्यात दिले आहेत.

डीवायएसपी यांच्या पथकाचे कौतुक

संगमनेर शहरात मोबाईल चोर्‍यांचेेे प्रमाण वाढले होते. डीवायएसपी राहुल मदनेे यांच्या पथकाने या चोरांचा तपास लावल्यानेे नागरिकांनी या पथकाचेे कौतुक केले. चोरी गेलेलेे मोबाईल मूळ मालकांना देण्यात आल्याने नागरिकांनी पोलीस अधिकारी व पथकातील कर्मचार्‍यांचा सत्कार केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या