Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामराठी माणसाला डिवचू नका; राज ठाकरेंनी राज्यपालांना सुनावले

मराठी माणसाला डिवचू नका; राज ठाकरेंनी राज्यपालांना सुनावले

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कोश्यारींच्या विधानाचा कडक शब्दांत समाचार घेतला आहे. मराठी माणसाला डिवचू नका, असा थेट इशारा राज यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? असा सवाल त्यांनी केलाय.

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या